राज ठाकरेंना भालू आणि चालू म्हणणार नाही - रामदास आठवले
रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चांगलेच चिमटे काढले. निवडणुकीच्या भाषणामध्ये बडाटे वडे आणि चिकन सूप काढणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणामध्ये असं करण योग्य नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत येणार नाहीत आणि आम्ही त्यांना सोबत घेणार नाही, असा टोला रिपाई नेते रामदास आठवले यांनी राज यांना लगावला.
Apr 9, 2014, 11:20 PM ISTमहायुती नेत्यांचा काँग्रेस आघाडी सरकारवर घणाघात
काँग्रेसच्या सरकारने वाट लावली आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण आघाडी सरकार सध्या हिंदू धर्मीयांवर अन्याय करत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तर काँग्रेसने देशाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका करत आमचे नेते नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले.
Feb 23, 2014, 11:02 PM ISTदोघांचे भांडण... `आरपीआय`ला लाभ?
माढाच्या जागेवरून महायुतीत बेबनाव निर्माण झालाय. माढाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्यामुळं महादेव जानकर नाराज झाल्याचंही म्हटलं जातंय. यातच, रामदास आठवलेंनी या दोघांच्या भांडणाचा लाभ उठवण्याचं ठरवलंय.
Feb 16, 2014, 05:55 PM ISTआठवले आणि भुजबळ भेट
रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते रामदास आठवले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवार दि. २३ डिसेंबर रोजी भुजबळ फार्म येथे सदिच्छा भेट घेतली.
Dec 24, 2013, 06:47 PM ISTकाहीही झालं तरी ‘एटीएम’ तुटणार नाही – मुंडे
‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.
Oct 21, 2013, 06:44 PM ISTद. म. मुंबईसाठी जोशी आणि आठवलेंमध्ये रस्सीखेच
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची बोलणी सुरु होण्याआधीच रस्सीखेच सुरू झालीय. प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या दक्षिण मध्य मुंबईसाठी शिवसेनेनं उमेदवाराची चाचपणी सुरु करताच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियानं या जागेवर दावा ठोकलाय.
Aug 10, 2013, 09:52 PM ISTआठवलेंनी घेतली आव्हाडांची भेट
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रिपाईचे नेते रामदास आठवले यांची ठाण्यात भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा रंगली आहे.
Jul 5, 2013, 10:03 PM ISTमहायुतीत चौथा भिडू नकोच- आठवले
महायुतीत चौथा भिडू नको यावर महायुतीतल्या जवळपास सर्वच पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. रामदास आठवलेंनीही मनसेला दूर ठेवण्याचा पुनरूच्चार केला आहे.
Jun 26, 2013, 05:55 PM ISTमहायुतीच्या सत्तेत रिपाइंचा उपमुख्यमंत्री- आठवले
2014च्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आरपीआयला देण्यात यावं, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केलीये.
Jun 2, 2013, 10:50 AM ISTराज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले
राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
Jun 2, 2013, 08:42 AM ISTमनसेच्या टाळीवरून आधी शिवसेनेचा टोला, आता महायुतीत गोंधळ
शिवसेनेनं आठवले आणि भाजप नेत्यांनाच कानपिचक्या दिल्यानंतर आता महायुतीतच गोंधळ निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर आज आठवलेंनी मुंडेंची भेट घेतल्यानं या गोंधळात आणखी भर पडली.
May 28, 2013, 07:23 PM ISTराज ठाकरेंनी टाळी द्यावी- रामदास आठवले
महायुतीत राज ठाकरेंनीही सहभागी व्हावं, असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. कुर्ल्यामध्ये संकल्प मेळाव्यात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना हे आवाहन केलं आहे.
May 26, 2013, 09:42 PM ISTथीमपार्कला नाव बाळासाहेबांचं की बाबासाहेबांचं?
महालक्ष्मीच्या रेसकोर्सच्या जागेवरून राजकारण तापलं असतांना, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. रेसकोर्स नवी मुंबईत हलवा, त्याचा करार वाढवू नका, असं आठवले यांनी म्हटलंय.
May 15, 2013, 05:41 PM ISTराज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं संकेत दिल्यानंतर राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते खुले केले नसले तरी महायुतीतील आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची मात्र दरदिवशी वेगवेगळी वक्तव्यं समोर येत आहेत.
Feb 3, 2013, 09:09 AM IST...तर हातभट्टीच्या दारूविक्रीवर बंदी नको - आठवले
दारूबंदी होणार नसेल, तर हातभट्टीच्या दारूविक्रीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
Jan 28, 2013, 06:39 PM IST