सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर
सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली.
Mar 28, 2012, 10:17 PM ISTगृहमंत्र्यांच्या राज्यात गुंडांचा धुमाकुळ
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्षाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलावारीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय. रामचंद्र मदने या युवकाचं अपहरण झालंय.
Mar 28, 2012, 08:53 PM ISTनक्षली हल्ल्यात जास्त बळी- आबा
गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.
Mar 28, 2012, 12:57 PM ISTसांगलीमध्ये आबांची अश्वासनं
वाळूमाफियांच्या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाया सुरु केल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे. याबाबत गृहविभाग महसूल विभागाला सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.
Mar 14, 2012, 08:50 AM IST'कृपा'छत्रावर छापे : आबांकडून पोलिसांची पाठराखण
गृहमंत्री आर आर पाटील यांनी पोलिसांची पाठराखण केली आहे. कृपाशंकर सिंह यांच्या घरांवर छापे टाकण्यास पोलिसांनी उशीर केला नाही असं गृहमंत्र्यांनी म्हटलयं. हायकोर्टानं दिलेल्या सुचनांनुसारच कारवाई सुरु असल्याचं आर आर पाटील यांनी म्हटलयं. पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कोणतीही कसूर केली नसल्याचं आर आर पाटील यांनी सांगितलं आहे.
Mar 2, 2012, 02:20 PM ISTगृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड
सांगली जिल्ह्यात म्हणजे गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जिल्ह्यात अफूची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिराळा तालुक्यातील तीन एकर जमिनीवर अफूची लागवड केली जात असल्याचं उघड झाले आहे. तर कोल्हापुरातही अफुची लागवड करण्यात आल्याचं पुढे आले आहे.
Feb 28, 2012, 06:27 PM ISTसांगलीमध्ये प्रतिष्ठेची झेडपी निवडणूक
सांगली जिल्हा परिषद आणि १० पंचायत समित्यांसाठी जिल्ह्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. सांगलीत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि पंचायत समितीचे १२४ गण आहेत.
Feb 7, 2012, 01:38 PM ISTटीका करताना दमानं, पवारांचा सबुरीचा सल्ला!
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे विरुद्ध अजित पवार आणि आर. आर. पाटील या जुगलबंदीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभांमधून बोलताना संयम पाळावा तसंच वैयक्तिक टीका करु नये, असा सल्ला शरद पवारांनी आर. आर. पाटील आणि अजित पवारांना दिला आहे.
Feb 3, 2012, 11:13 PM IST'जाऊ बाई' जोरात !
सांगली जिल्ह्यातल्या येळावी गटातून दोन सख्या जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. ज्येष्ट नेते विश्वास पाटील यांची मोठी सून तेजस्विनी पाटील या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.
Feb 3, 2012, 10:37 PM ISTराणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 2, 2012, 08:45 AM ISTगडचिरोलीत जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम
गेल्या पाच वर्षातल्या कामामुळे तसंच केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं सरकार असल्यामुळं यावेळीही गडचिरोली झेडपीत काँग्रेसची सत्ता येईल असा त्यांच्या नेत्यांना विश्वास वाटत आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गृहमंत्री आर आर पाटील यांनी घेतली आहे.
Jan 27, 2012, 10:30 PM ISTआबांनी केलं सेना, मनसेला लक्ष्य
उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सेनेवर टीका केली आहे. परप्रांतीयांना मुंबईतून हाकलण्यामध्ये खऱ्या अर्थानं मनसेपेक्षा शिवसेनेलाच अधिक श्रेय जातं असा टोला त्यांनी लगावला.
Dec 5, 2011, 03:04 AM IST'समुद्रातील' मुंबई 'खड्ड्यात' घातली- आबा
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील शीतयुद्ध चांगलंच रंगत चाललं आहे. आधी पवार आणि ठाकरे वाद यामुळे वादाला सुरवात होताच प्रत्येकांने यात उडी मारली.
Dec 4, 2011, 06:31 AM IST