कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात
Ajit Pawar : आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र अर्थखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत. त्यामुळं महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडलेत.
Jan 11, 2025, 07:32 PM IST