नवी दिल्ली । निर्भया प्रकरणातील चार दोषींना स्वतंत्र फाशी नाही!
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने फाशीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढल्या सात दिवसांमध्ये दोषींनी त्यांना उपलब्ध असलेले माफीचे पर्याय वापरावेत, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राची याचिका फेटाळली.
Feb 5, 2020, 07:05 PM ISTनिर्भया प्रकरण : चार दोषींना वेगवेगळी फाशी देता येणार नाही - उच्च न्यायालय
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
Feb 5, 2020, 04:52 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
May 5, 2017, 08:22 AM IST