नाशिकमध्ये सराईत गुन्हेगारावर गोळीबार
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार भीम पगारेवर गोळीबार झालाय. यांत त्याचा मृत्यू झालाय. नाशिकच्या राजीवनगर परिसरात ही घटना घडलीय.
May 10, 2014, 09:46 AM ISTनाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
Apr 24, 2014, 01:26 PM ISTराज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ
महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.
Apr 19, 2014, 10:50 PM ISTपुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.
Apr 18, 2014, 05:48 PM ISTनाशकात मनसेचा नमो नमोचा जप, मनसेच्या पत्रकांमध्ये मोदी!
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून मनसेनं सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. भाजपच्या पदाधिकार्यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.
Apr 14, 2014, 09:38 AM ISTसिंधुदुर्गातलं काँग्रेस-राष्ट्रवादी नाराजीचं लोण आता नाशकात!
सिंधुदुर्गात राष्ट्रवादीच्या आमदरांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांच्या विरोधात असहकार पुकारल्याचे पडसाद नाशिक लोकसभा मतदार संघात दिसून येताहेत.
Apr 14, 2014, 09:12 AM ISTखूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!
त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.
Apr 7, 2014, 09:27 PM ISTनाशिकमध्ये हॉटेलमध्ये मारामारी, तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय. त्यात हॉटेलमालकाचाही समावेश आहे. हॉटेलमध्ये बुधवारी रात्री दारु पिऊन एका गटानं गोंधळ घातला. त्यात एकाच मृत्यू झालाय.
Mar 27, 2014, 01:30 PM ISTउद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा मतदार संघनिहाय उद्धव ठाकरे महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेणारेत.
Mar 24, 2014, 09:07 AM ISTभुजबळांच्या ट्रस्टची चौकशी करून कारवाई करा - हायकोर्ट
बांधकाममंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या, नाशिक येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवहाराची मुंबई उच्च न्या़यालयानं दखल घेतलीये. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची शिक्षण शुल्क कमिटीने चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश मंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Mar 14, 2014, 08:34 PM ISTनाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार, तरूण ठार
नाशिकच्या पंचवटी भागात झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात ठार झालेल्या युवकाचं नाव प्रवीण हांडे असं आहे.
Mar 10, 2014, 11:27 AM ISTनाशिकमध्ये सलमान, सुनील शेट्टीची बोट सफर
आगामी लोकसभा निवडणुका एका एक दिवस जवळ येत असल्यानं भूमिपूजन आणि उद्घाटनांची मालिकाच सध्या सुरु आहे.
Feb 25, 2014, 11:14 PM ISTउत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान
नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Feb 25, 2014, 12:25 PM ISTदहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले
संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Feb 23, 2014, 06:39 PM IST