nashik

राज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली

राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

Jul 30, 2014, 12:10 PM IST

नाशिकमध्ये आणखी दोन घोटाळे उघड

राज्यात सध्या घोटाळ्याचं पेव फुटलंय. नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कोट्यवधींच्या केबीसी घोटाळ्यानंतर आणखी दोन घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये सुपर पॉवर घोटाळा उघडकीस आलाय. यातही राज्यासह इतर राज्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालय.

Jul 28, 2014, 09:47 PM IST