मनसे प्रदेश सरचिटणीस यांना अटक
मनसे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणी चांडक यांना अटक करण्यात आली आहे.
Jan 16, 2014, 10:56 AM ISTनाशिकच्या कारभारावर राज ठाकरे चिडलेत, विरोधात बसा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौ-यानंतर महापौर बदलणार या चर्चेला उधाण आलंय. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राज यांनी महापालिकेच्या कारभारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सत्तेत बसून काम करु शकत नसेल तर विरोधात बसलेलं कधीही चांगलं असं सुनावून राज बैठकीतून उठून गेलेत.
Jan 11, 2014, 11:05 PM ISTनाशिकवरून राज ठाकरे मुंबईत परतलेत, टीकेची झोड कायम
नाशिक दौऱ्यावरून राज ठाकरे मुंबईत परतलेत. मात्र, राज यांच्या व्यक्तव्यावरून भाजप आणि मनसेत दुरावा झालाय. आता तर महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत असं ठणकावणा-या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं होतं. आता छगन भुजबळ यांनी राज यांना टोला मारलाय. महाराष्ट्राचा बाप होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा प्रबोधनकारांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवा असं भुजबळ यांनी म्हणाले.
Jan 11, 2014, 06:41 PM ISTराज ठाकरेंच्या कार्यक्रमावर बहिष्कार, युती तोडा - भाजप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नरेंद्र मोदींवरील विधानानंतर नाशिक मनपातील सत्ताधारी मनसे आणि भाजपमध्ये कटूता वाढलीये. उद्या होणा-या भूमिपूजन आणि विकास कामांच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकलाय. दरम्यान, मनसेबरोबरची युती तोडण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
Jan 10, 2014, 06:35 PM IST‘मोदींच्या प्रसिद्धीमुळं पोटात दुखतंय’ फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सातत्यानं कुठल्या एका प्रदेशाबद्दल बोलत नाहीत तर ते देशाबद्दल, देशाच्या विकासाबाबत बोलतात.
Jan 9, 2014, 01:52 PM ISTमहाराष्ट्रात मनसेच ‘आप’चा बाप, राज ठाकरेंनी काढला चिमटा!
नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपचं अभिनंदन करतांना महाराष्ट्रात मात्र मनसेच ‘आप’चा बाप असल्याचं म्हटलंय. दिल्लीमध्ये काम न केल्याचा काँग्रेसला फटका बसला असंही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली मत मांडली.
Jan 9, 2014, 12:58 PM ISTनाशिकमध्ये काय म्हणाले राज ठाकरे !
महाराष्ट्र प्रगतीच्या बाबतीत अग्रस्थानी, पण आलेख चढता हवा - राज ठाकरे
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याची माझी इच्छा आजही कायम - राज ठाकरे
राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी यांना पीएमपदासाठी आपला पाठिंबा नसल्याचं म्हणत मोदींवर हल्लाबोल केलाय.
Jan 9, 2014, 12:18 PM ISTराज ठाकरे लागले कामाला, चार दिवसांचा दौरा!
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच पक्ष कामाला लागले असताना मनसेही आता मागे राहिलेली नाही. महापालिकेतली पहिली सत्ता, तीन आमदार आणि ४० नगरसेवक देणा-या नाशकात राज ठाकरेंचा चार दिवस दौरा आहे...
Jan 8, 2014, 09:13 PM ISTनाशिक, धुळे येथे भूकंपाचे धक्के
नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. कळवण, पाळे, दळवट परिसरात ५ ते ७ सेकंद भूकंपाचे धक्के बसलेत.
Jan 7, 2014, 11:41 PM ISTनाशिकचा बालेकिल्ला शिवसेना मनसेकडून मिळवणार?
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
Dec 30, 2013, 08:16 PM ISTपवारांच्या बारामतीत दारूची दुकाने, बंदसाठी ग्रामस्थांचे आंदोलन
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत २२ गावांनी पाण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील तमाम जनता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येतेय. बारामती तालुक्यातील शिर्सुफळमध्ये दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ नवीन वर्षाच्या स्वागतालाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीचं याकडे लक्ष लागलं आहे.
Dec 24, 2013, 02:16 PM ISTशेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार
कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.
Dec 24, 2013, 02:11 PM ISTयेवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट
जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.
Dec 18, 2013, 07:54 PM ISTमहिलांनो तुमच्यासाठी, नाशिक पोलिसांचा विशेष उपक्रम
दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.
Dec 16, 2013, 08:21 PM IST