mumbai railway

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक, मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेवर आज सांताक्रूझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत हा जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक अप आणि डाऊन अशा दोन्ही स्लो मार्गांवर असणार आहे. त्यामुळे सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांमध्ये अप आणि डाऊन स्लो मार्गांवरील गाड्या फास्ट मार्गांवरून चालवण्यात येणार आहेत. तसंच सर्व स्लो लोकलना विलेपार्ले स्थानकातील फास्ट मार्गावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ आ​णि ६ वर विशेष थांबा देण्यात येणार आहे.

Sep 3, 2017, 10:36 AM IST

मध्य रेल्वे लोकल कुर्ला येथे का रखडली होती, खरं कारण!

मंगळवारी अतिवृष्टीने मुंबईला झोडपून काढताना जलमय करुन टाकले. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचे तिनतेरा वाजले आणि धावणाऱ्या मुंबईला फुल स्टॉप लावला. 

Aug 31, 2017, 01:13 PM IST

मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन घसरल्याने लांबपल्याच्या गाड्या खोळंबल्या

मध्य रेल्वे मार्गावर कर्जत दरम्यान मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावर घसरल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांवर परिणाम झालाय. तसेच मुंबई फास्ट लोकलवर याचा परिणाम दिसत आहे. अनेक गाड्या खोळंबळ्या आहेत.

Jul 18, 2017, 06:32 PM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Jul 16, 2017, 09:07 AM IST

मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी सव्वा चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या काळात ही वाहतूक अपधिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.

May 14, 2017, 09:09 AM IST

मुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 26, 2017, 08:37 AM IST

मुंबईतल्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पाला नीती आयोगाची मंजुरी

मुंबईतल्या एका मोठ्या रेल्वे प्रकल्पासाठी नीती आयोगानं मंजुरी दिली आहे. विरार- वसई-पनवेल या मार्गाला आयोगानं मंजुरी दिलीय. या प्रकल्पासाठी ९ हजार ३५६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

Sep 2, 2016, 08:41 AM IST

रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे.

Jul 13, 2016, 10:10 PM IST

रेल्वे सेवा खंडीत, भांडूप स्टेशनवर महिलेची प्रसूती

मध्य रेल्वेच्या खोळंब्याचा परिणाम प्रवाशांसह सर्वसामान्यांना बसला. भांडूप स्टेशन एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेची प्रसूती स्थानकावरील महिलांनीच केली.

Jun 21, 2016, 03:03 PM IST

संरक्षक भिंत कोसळली, मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ठप्प

संरक्षक भिंत पडल्याने ठाणे रेल्वे स्थानकावर जलद मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे ३ आणि ४ फ्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंदच आहे. त्यामुळे आधीच उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे अधिक हाल झालेत.

Jun 21, 2016, 12:32 PM IST