mining mafia

राज्यात अवैध खाणकामांचा वाढता आलेख

संपूर्ण देश धुळवड साजरी करत असतानाच मध्यप्रदेशमध्ये अवैध खाणकाम रोखताना आयपीएस अधिका-याची हत्या केली. झी रिसर्च ग्रृपनं अवैध खाणकाम प्रकरणांचा मागोवा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातही अवैध खाणकामांचा वाढता आलेख दिसून आला आहे.

Mar 9, 2012, 11:05 PM IST

आयपीएस अधिका-याला टॅक्टरखाली चिरडले

मध्यप्रदेशमध्ये खाणमाफियांचा धुमाकुळ सुरू आहे. या माफियांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगावर टॅक्टर घालून चिरडले. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्या राज्यात माफिया राज असल्याने सर्वच थरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. नरेंद्र कुमार हे आपले कर्तव्य बजावत होते. या आधी महाराष्ट्रातही यशवंत सोनवणे यांचाही बळी भेसळ करणाऱ्या माफियांनी घेतला होता.

Mar 8, 2012, 09:00 PM IST