marathi news online

इंडोनेशियात सिनाबंग ज्वालामुखीचा उद्रेक, पाहा भयाण परिस्थिती...

  इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सोमवारी माऊंट सिनाबंग ज्वालामुखीत मोठा स्फोट झाला. यामुळे सुमारे पाच हजार मीटरच्या उंचीचा राखेचा ढग बनला आणि त्यातून लाव्हा बाहेर पडू लागला. 

Feb 20, 2018, 05:52 PM IST

परब फिटनेसचा सुजल पिळणकर मुंबई श्री

  दृष्ट लागण्याजोगं झालेलं दिमाखदार आयोजन आणि शरीरसौष्ठवपटूंची पीळदार शरीरयष्टी पाहून तहानभूक विसरलेल्या तब्बल पाच हजार क्रीडाप्रेमींना मुंबई श्रीचा पीळदार आणि दमदार थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. एकापेक्षा एक खेळाडू असलेल्या मुंबई श्रीच्या जेतेपदाच्या लढतीत परब फिटनेसच्या सुजल पिळणकरने फॉर्च्युन फिटनेसच्या सकिंदर सिंग आणि आर.एम.भट जिमच्या सुशांत रांजणकरवर मात केली आणि आपल्या स्वप्नवत जेतेपदावर यशाची मोहोर उमटविली. तसेच फिजीक्स फिटनेस प्रकारात प्रथम बागायतदार आणि रोहन कदम यांनी बाजी मारली.

Feb 20, 2018, 05:38 PM IST

मोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव

  पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे.  मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे. 

Feb 20, 2018, 04:19 PM IST

माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...

  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

राज ठाकरेंनी घेतला व्यंग्यचित्रातून संघाचा समाचार...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच भारतीय लष्कराबद्दल केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग्यचित्रातून टोकदार भाष्य केले आहे.  राज ठाकरेनी आपल्या फेसबूक पेजवर हे व्यंगचित्र पोस्ट केले असून ते सध्या खूप व्हायरल होत आहे. यात सरसंघचालक यांच्या वक्तव्याची टर उडवली आहे. 

Feb 14, 2018, 08:40 PM IST

प्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे. 

Feb 13, 2018, 08:40 PM IST

रितेश आणि जेनेलियाच्या भांडणाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल!

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत. 

Feb 13, 2018, 08:06 PM IST

'व्हॅलेंटाइन डे'... लग्नानंतरचा

14 फेब्रुवारी... व्हॅलेंटाइन डे... जगभरातल्या तमाम प्रेमवीरांचा खास दिवस... WILL YOU BE MY VALENTINE? अशा शब्दांत आपल्या लाडक्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याचा दिवस... तुमची प्रेमळ विनंती ती किंवा तो मान्य करतो.. प्रेमाच्या रोमांचक सिनेमाचा 'हॅप्पी दि एन्ड' होतो... 'शुभ मंगल सावधान' होतं... तो आणि ती संसाराचा रहाटगाडा ओढू लागतात... आणि मग पुन्हा येतो 'व्हॅलेंटाइन डे'... लग्न झालेल्यांचा 'व्हॅलेंटाइन डे' असतो तरी कसा...? वाचा...

Feb 13, 2018, 07:44 PM IST

‘हेट स्टोरी ४’मधील सर्वात बोल्ड गाणं रिलीज, बघा व्हिडिओ

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रोमॅंटिक गाण्यांचीही सध्या चलती बघायला मिळत आहे. अशातच ‘हेट स्टोरी ४’ या सिनेमातील एक धमाकेदार रोमॅंटिक गाणं रिलीज करण्यात आलंय. 

Feb 13, 2018, 07:08 PM IST

प्रिया वॉरिअरने सनी, आलियासह कतरिनालाही टाकले मागे!

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या नजरेने घायाळ करणा-या अभिनेत्री प्रिया वारीयरने लोकप्रियतेच्या बाबतीत चक्क सनी लिओनलाही मागे टाकलंय. दोन दिवसांमध्ये प्रिया वारियरला गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

Feb 13, 2018, 06:47 PM IST

राज्यांतील शाळांमध्ये गांधी, आंबेडकरांपेक्षा आता अधिक वाचा नरेंद्र मोदी,

राज्याच्या शिक्षण विभागाने पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजने अंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या या पुस्तकांमध्ये नरेंद्र मोदींवरील पुस्तकांची संख्या आणि त्या पुस्तकांची किंमत लक्षणीय असल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या तीन महान व्यक्तींची पुस्तक खरेदीची किंमत एकत्रित केली तरी येणाऱ्या रकमेपेक्षा मोदींवरील पुस्तक खरेदीची किंमत जास्त असून ती 60 लाखाच्या घरात आहे. मात्र ही सर्व खरेदी पारदर्शकपणे झाल्याचा दावा खुद्द शिक्षणमंत्र्यांनी केलाय.

Feb 13, 2018, 05:51 PM IST

रेल्वे तिकीट नसेल तरी लागणार नाही दंड, पाहा काय आहे हा नियम

रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी चुकते तर काही जण या कारणामुळे विनातिकीट प्रवास करतात. 

Feb 13, 2018, 05:17 PM IST

सोशल मीडियावर ट्रेंड प्रियाचा ट्रम्प यांच्यासोबतचा हा व्हिडिओ आता व्हायरल

व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Feb 13, 2018, 05:13 PM IST

भाजपमध्ये गेल्याने, आपल्याच माणसांनी मशिदीत नमाज पठणास रोखलं...

  त्रिपुरामध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीत एका गावात समर्थकांमध्ये विभाजन झाले आहे. त्यात भाजपला समर्थन करणाऱ्या व्यक्तींना मशिदीत नमाज पठण करण्यास रोखले. 

Feb 13, 2018, 04:13 PM IST

Video : सेहवागने आजही काढली शोएब अख्तरची पिसे... पण...

स्वीत्झरलँडच्या सेंट मोरिट्समध्ये आईस क्रिकेटचा दुसरा सामना अपेक्षेनुसार रोमांचक राहिला. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानी गोलंदाजांना धू-धू धुतले. परंतु,  धडाकेबाज फलंदाजी करूनही त्यांचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना पहिल्या सामन्याचा रिप्ले झाला. 

Feb 9, 2018, 10:48 PM IST