शाहरुखची कोलकता अव्वलस्थानी
शाहरुख खानच्या कोलकता नाइट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा गडी राखून पराभव करत आयपीएलच्या गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या चार सीझनपासून खराब कामगिरी करणाऱ्या शाहरुखच्या केकेआरने यंदाच्या मोसमात जबरदस्त कामगिरी केली आहे.
May 7, 2012, 11:45 PM ISTदिल्लीचे कोलकत्यासमोर १५४ आव्हान
आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये आघाडीच्या स्थानावर असलेल्या दिल्ली आणि कोलकात्यातील सामन्यात पहिल्या डावात दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत कोलकात्याला १५४ धावांचे आव्हान दिले. अष्टपैलू इरफान पठाण (३६) जयवर्धने (३०) आणि कर्णधार वीरेंद्र सेहवागने ९ चेंडूत तीन चौकार व एक षटकारासह काढलेल्या २३ धावामुळे दिल्लीला १५३ धावांपर्यंत मजल मारता आली.
May 7, 2012, 10:12 PM ISTगेलची एकाकी खेळी 'फेल'
कर्णधार गौतम गंभीरच्या शानदार ९३ धावांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने उभारलेला १९१ धावांचा डोंगर पार करण्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स तोकडे पडले त्यांना केवळ १४३पर्यंत मजल मारता आली.
Apr 29, 2012, 09:35 AM ISTराजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का
मुंबई इंडियनकडून पराभव पत्करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का कोलकाताकडून बसला. गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. द्रविडच्या राजस्थान रॉयल्सला ५ गड्यांनी नमवून गौतमच्या कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या ईडन गार्डन मैदानावर सलग दुसरा विजयोत्सव साजरा केला. युसूफ पठाण , रेयान या जोडीच्या नाबाद खेळीच्या जोरावर कोलकात्याने ५ गडी राखून विजयाचे १३२ धावांचे लक्ष्य गाठले.
Apr 14, 2012, 01:10 PM ISTआज वीरूला 'गंभीर आव्हान'
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.
Apr 5, 2012, 02:57 PM IST