farmers strike

शेतकऱ्यांनंतर राज्य सरकारचे कर्मचारी संपाच्या तयारीत

शेतकऱ्यांच्या संपाचं वादळ अजून काही तासही झालेले नाहीत. तोच राज्य सरकारसमोर आणखी एका संपाचं भूत उभं राहिलंय. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपाच्या तयारीत आहेत.

Jun 13, 2017, 03:20 PM IST

शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक

शेतकरी संपाची सुकाणू समितीची बैठक माहीम कोळीवाड्यातील शेकाप भवनमध्ये सुरु आहे. या बैठकीसाठी राजू शेट्टी, जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे पाटील, बैठकीसाठी उपस्थित आहेत. प्रहार संघटनेचे प्रतिनिधी देखिल उपस्थित आहेत.

Jun 10, 2017, 06:00 PM IST

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरली

शेतकरी संपाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. कालपर्यंत शेतात दिसणारा भाजीपाला आजपासून मोठया प्रमाणात बाजार समितीमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. लिलावप्रक्रियेत ही शेतकरी भाग घेणार आहेत. त्याचबरोबर संपाचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी सुकाणू समितीचे सदस्य रणनिती आखणार आहेत.

Jun 9, 2017, 01:36 PM IST

शिवसेनेने रोखला मुंबई-गोवा महामार्ग

शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना गप्प बसणार नाही, अशा घोषणा देते जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातखंबा तिठा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यामुळे काहीकाळ येथे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आणि मार्ग मोकळा केला.

Jun 8, 2017, 12:35 PM IST

शेतकरी आंदोलन : बंदच्या काळात लूट-जाळपोळ, रस्ता-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

Jun 8, 2017, 10:07 AM IST

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पंतप्रधानांनी घेतली दखल

मध्यप्रदेशात शेतकरी आंदोलनाची दखल आज थेट पंतप्रधानांनी घेतली. 

Jun 7, 2017, 04:26 PM IST