Benefits Of Green Peas : खाण्यापिण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे जगभरात डायबिटीस रुग्णांची संख्या वाढत आहे. डायबिटीसवर वेळीस नियंत्रण मिळवले नाही तर अनेक आजारांचा धोका वाढतो. तेव्हा हिवाळ्यात हिरवे मटार \ वाटाण्यांच्या सेवनामुळे शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी मदत होऊ शकते. हिवाळ्यात बाजारात विकल्या जाणाऱ्या हिरव्या वाटाण्यांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करणारे पोषक घटक असतात.
हिरव्या वाटाण्यांमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सचं प्रमाण कमी असतं. जे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये आणण्यास मदत करते. हिरव्या वाटाण्यांमध्ये फायबर आणि प्रथिने देखील रक्तातील साखरेतील चढ-उतार रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.
हिरव्या वाटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहतं, ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि अतिरिक्त खाणं टाळलं जातं.
हिरव्या वाटाण्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील चांगले असते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि स्नायूंना दुरुस्त करण्यास मदत करते. तेव्हा जर तुम्ही जिम करत असाल तर तुमच्या आहारात मटारचा नक्कीच समावेश करा.
हेही वाचा : सांध्यांमध्ये साचलेले युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल 'ही' हिरवी चटणी; वाचा सोपी रेसिपी!
हिरवे वाटाणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तेव्हा अर्धा कप हिरव्या वाटण्यामध्ये 47% व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.
हिरव्या वाटाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पोटभरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे जास्त खाणं टाळलं जात. परिणामी वजन नियंत्रणात राहते.
हेही वाचा : हिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच
हिरव्या वाटण्यांचा आहारात समावेश करणं हे अतिशय सोपं आहे. हिरवे मटार किंवा वाटाणे उकडून, सूपमध्ये किंवा सॅलेडमध्ये टाकून सुद्धा त्याचे सेवन करू शकता. हिवाळा हा हिरव्या वाटण्याचं सीजन असल्याने ताजे मटार बाजारात उपलब्ध असतात आणि त्यामुळे आरोग्याला अधिक फायदे मिळतात.