black money

नोटाबंदीचा निर्णय गरिबांना त्रासदायक, निर्बंधामुळे छोटे उद्योग अडचणीत - मनमोहन सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावर माझा विरोध नाही, मात्र त्यासाठी पूर्वतयारी करण्यात आली नव्हती. तसेच सरकारच्या या निर्णयाचा गरिबाला फटका बसतोय. छोटे व्यवसायिक अडचणीत आलेत. याचा परिणाम जीडीपीवर होणार आहे. हा परिणाम दोन टक्क्यांपर्यंत होईल, असे भाकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला. 

Nov 24, 2016, 12:39 PM IST

नोटाबंदीमुळे या टीव्ही अभिनेत्याने आपले लग्न पुढे ढकलले

केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर याचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतोय. 

Nov 24, 2016, 11:52 AM IST

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.

Nov 24, 2016, 11:31 AM IST

पश्चिम बंगालमधील जनधन खात्यांमध्ये सर्वाधिक रक्कम जमा

नोटाबंदीनंतर देशभरातील जनधन खात्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम जमा झालीये. आतापर्यंत जनधन खात्यांमध्ये 21 कोटीहून अधिक रक्कम जमा झालेली आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल राज्यातील जनधन खात्यांमध्ये जमा झालेली रक्कम सर्वाधिक आहे.

Nov 24, 2016, 10:07 AM IST

नोटाबंदी : असं एक गाव... जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता

केंद्र सरकारनं नोटा रद्द केल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव सापडणार नाही. देशात एक गाव असं आहे जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता. 

Nov 24, 2016, 09:13 AM IST

नोटाबंदीमुळे गुजरातमधील कर्मचाऱ्यांना दिले जातेय आगाऊ वेतन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यानंतर गुजरात औद्योगिक विकास प्राधिकरणमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुढील काही महिन्यांचा आगाऊ पगार दिलाय.

Nov 24, 2016, 09:11 AM IST

नोटाबंदी आणि संसदेतील कोंडी : मोदी सरकार विरोधकांपुढे झुकण्याची चिन्हं!

संसदेतील कोंडी सातव्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. आधी मी कोणतीही चर्चा करणार नाही, असे मोदींनी म्हटले होते.

Nov 24, 2016, 08:20 AM IST

500, 1000च्या जुन्या नोटा या ठिकाणी स्वीकारण्याची मुदत आज मध्यरात्रीपर्यंत ... त्यानंतर

चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत मध्यरात्री बारा वाजता संपणार आहे.  

Nov 24, 2016, 07:47 AM IST

नोटबंदीच्या निर्णयावर या महिलेचे मत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल? पाहा व्हिडिओ

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष संसदेत वारंवार अडथळे निर्माण करीत आहे. तसेच विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे एक महिला नोटबंदीच्या मुद्द्यावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Nov 23, 2016, 10:40 PM IST

मोदी अॅप : नोटबंदीवर सरकारला 90 टक्के जनतेचा पाठिंबा

नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.  

Nov 23, 2016, 09:52 PM IST

मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा ठाकरे बंधुंना फटका

नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जसा सर्वसामान्यांवर होतोय, तसा तो राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांवरही होतोय. मोठ्या गाजावाजात सुरु झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शाखा भेटींचे दौरे, त्यामुळे काही दिवसांतच गुंडाळावे लागल्याचं चित्र आहे. 

Nov 23, 2016, 07:13 PM IST