abhijeet shwetchandra wedding

'लक्ष्य' फेम अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत!

सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळीकडे आता लगीन घाई सुरु आहे. कधी आपल्या ओळखीच्या कोणत्या व्यक्तीचं लग्न होतय तर कधी आपला आवडता सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या सगळ्यांची लाडकी आणि हास्यजत्रा फेम वनिता खरात लग्न बंधनात अडकली होती. त्यानंतर आता 'लक्ष्य' फेम अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetchandra) हा लग्न बंधनात अडकला आहे. अभिजीत हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 25, 2023, 05:38 PM IST