विमानतळ

पाकिस्तानात विमानावर हल्ला, एक ठार दोन जखमी

पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानावर जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विमानातून उतरत असताना बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार गेला.  

Jun 25, 2014, 10:04 PM IST

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

Jun 22, 2014, 07:53 PM IST

आयुर्वेदिक पावडरमुळे ऋचा अडकली चौकशीच्या फेऱ्यात...

चित्रपट `ओये लकी` ची फेम अभिनेत्री ऋचा चड्ढाला दिल्लीच्या विमानतळावर चौकशीचा सामना करावा लागला आहे. ऋचाजवळ असलेल्या आयुर्वेदिक पावडर संशयित मिळाल्याने दोन तास तिची चौकशी करण्यात आली.

Jun 21, 2014, 03:04 PM IST

हाफीज सईदच्या उलट्या बोंबा, म्हणाला कराची हल्ल्यामागे मोदी

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदनं कराचीतील दहशतवादी हल्ल्यासाठी थेट भारताला जबाबदार ठरवलंय. मोदींच्या नवीन सुरक्षा पथकानंच हा हल्ला केल्याचे मुक्ताफळंही त्यानं उधळली आहे.

Jun 9, 2014, 03:16 PM IST

सोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!

केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.

Jun 3, 2014, 07:52 AM IST

वडेरांची सुरक्षा काढण्याची प्रियांकाची मागणी

रॉबर्ट वडेरा यांना दिलेली एनएसजी सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी खुद्द प्रियांका वडेरा यांनीच केलीये. प्रियांका यांनी एनएसजी संचालकांना पत्र पाठवलंय.

May 30, 2014, 10:50 PM IST

मुंबई एअरपोर्टवर २५ किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं कारवाई करत २५ किलो पेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. या सोन्याची किंमत ६ कोटी ५३ लाख ९१ हजार रुपये आहे.

May 11, 2014, 08:39 PM IST

श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही

`श्रीलंकन एअरलाइन्स` आता `वन वर्ल्ड` या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील संघटनेत सामील झाली आहे.

May 1, 2014, 07:24 PM IST

मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.

Apr 20, 2014, 04:13 PM IST

अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...

नुकतंच, माधुरीला एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता ती आली असताना तिला अधिकाऱ्यांनी चक्क एअरपोर्ट व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर काढलं...

Mar 3, 2014, 01:01 PM IST

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2013, 08:15 AM IST

लॉस एंजिलिसच्या विमानतळावर ड्राय आईसचा स्फोट

ड्राय आईसच्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा स्फोट झाल्यानं आज लॉस एंजिलिसच्या चार विमानांचं उड्डाणं रद्द करावं लागलं. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.

Oct 14, 2013, 08:13 PM IST

अमरसिंग विमानतळावर बेशुद्ध, हॉस्पिटलमध्ये दाखल

समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंग यांना दुबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तेथील विमानतळावर चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Feb 19, 2013, 10:38 AM IST

अभिनेत्री दिया मिर्झाला १.२५ लाखाचा दंड

अभिनेत्री दिया मिर्झा हिला सीमाशुल्क चुकविल्याप्रकरणी १.२५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज शनिवार सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Jan 7, 2012, 02:20 PM IST

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत

एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.

Dec 14, 2011, 12:26 PM IST