`दादा... आक्रमकतेला मुरड घाला`
‘अजितदादांनी टीका करणं थांबवावं अन्यथा त्यांना सडेतोड भाषेत उत्तर देऊ’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
Oct 1, 2012, 10:58 AM ISTमाणिकरावांचा `ठाकरी` राग
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी ठाकरी राग आळवलाय. सीएसटी हिंसाचार प्रकरणातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर कारवाई करण्यासंदर्भात पत्र देणा-या बिहार राज्याच्या सचिवानं मोठी चूक केल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय.
Sep 10, 2012, 09:32 PM ISTराज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे
`राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात कारवाई करा`, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.
Sep 7, 2012, 06:11 PM ISTराष्ट्रवादीला माणिकराव ठाकरेंचे उत्तर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेला आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी तशाच शब्दांत उत्तर दिले.
Jul 30, 2012, 08:41 PM ISTभारत-पाक वन डे मालिकेला मंजूरी
भारत आणि पाकिस्तानात दोन्ही देशांमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून बंद असलेल्या क्रिकेट मालिकेला मंजूरी मिळाली आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघ येत्या डिसेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत तीन एक दिवसीय सामने होणार आहेत.
Jul 16, 2012, 05:32 PM ISTभारत-पाक सामन्यांना महाराष्ट्र काँग्रेसचा विरोध
पाच वर्षानंतर होत असलेल्या भारत पाक क्रिकेट सीरिजला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं विरोध केलाय. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याबाबत बीसीसीआयनं फेरविचार करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली आहे.
Jul 16, 2012, 04:27 PM ISTविधान परिषदेसाठी कोण असतील काँग्रेस उमेदवार?
आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली.
Jul 8, 2012, 12:37 PM ISTराज ठाकरेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
काँग्रेसने मनसेच्या आंदोलनाचे समर्थन करून राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्यांच्या कामांचा खर्च वसुल होऊनही टोल नाके सुरू असले तर ते चुकीचे असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी झी 24 तासशी बोलताना स्पष्ट केलंय.
Jun 12, 2012, 11:14 PM ISTमाणिकरावांचं सूडाचं राजकारण?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. माणिकरावांनी सुडाचं राजकारण केल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे.
Jun 5, 2012, 10:28 AM ISTकाँग्रेसला राष्ट्रवादीने गृहीत धरू नये- माणिकराव
राष्ट्रवादीच्या धमकीला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं काँग्रेस गृहीत धरू नये असा टोला माणिकराव ठाकरेंनी लगावला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची राज्यात जरी आघाडी असली तरी स्थानिक नेतृत्वात अजिबात सुसंवाद नाहीये.
Apr 20, 2012, 01:41 PM ISTआघाडीत बिघाडी?
पवारांच्या वक्तव्याला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. पुढच्या निवडणूकीत आघाडी ठेवायची की नाही याचा विचार करु, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
Mar 24, 2012, 10:08 PM ISTअमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे
अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.
Feb 13, 2012, 02:46 PM ISTमाणिकराव ठाकरेंवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Feb 9, 2012, 07:57 PM ISTमाणिकरावांचं मानसिक संतुलन बिघडलंय- राठोड
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा टोला, शिवसेना आमदार संजय राठोड यांनी लगावला आहे. मुलाला विजयी करण्यासाठी ते माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचंही राठोड यांनी म्हटलं.
Feb 8, 2012, 09:36 AM IST'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'
ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.
Feb 4, 2012, 12:11 PM IST