`मराठी तरुण राज ठाकरेंच्या चुकीची फळं भोगतायत`
‘मराठी तरुणांची डोकी भडकवायची आणि त्यांना मारहाण-तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहीत करायचं आणि खटला दाखल झाल्यावर आपण त्यातून नामानिराळं व्हायचं... म्हणजेच मराठी तरुण यांच्या शिक्षेची फळं भोगतायत त्यांच्यावर अजूनदेखील खटले सुरू आहेत’
Jun 14, 2013, 10:55 AM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM IST‘आत्मक्लेष नव्हे, आत्मचिंतन करा!’
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चूक झाली म्हणून ‘आत्मक्लेश’ केला पण राष्ट्रवादीनं विदर्भामध्ये भाजप सेनेशी युती करुन जी चूक केलीय त्यावर त्यांनी आत्मचिंतन करावं’ असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिलाय.
Apr 17, 2013, 10:20 AM IST‘दादांच्या राजीनाम्याशी काँग्रेसचा संबंध नाही’
यावेळी दुष्काळग्रस्तांबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी काँग्रेसचा संबंध नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Apr 13, 2013, 10:02 AM ISTपैशांच्या पाऊस,आमदाराला घातले माणिकरावांनी पाठिशी
बुलढाण्यात पडलेला नोटांचा पाऊस हा आमदारावर नव्हे तर कव्वालीच्या कार्यक्रमावर उधळल्याचा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.
Apr 10, 2013, 04:52 PM ISTसेनेचे आमदार-खासदार संपर्कात - माणिकराव ठाकरे
शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.
Mar 10, 2013, 09:25 AM ISTCM पदावरून राष्ट्रवादीला चव्हाणांचा टोला
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख्यमंत्री व्हायचे ते मतदानानंतर ठरवू.
Mar 5, 2013, 04:44 PM IST`कोहिनूर मिल जाऊ नये म्हणून शिवाजी पार्कची मागणी`
कोहिनूर मिलची जागा जाईल म्हणून मनोहर जोशी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्कचा हट्ट करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केला आहे.
Nov 25, 2012, 10:25 PM ISTराष्ट्रवादी गुंडांचा पक्ष? - शरद पवार
माणिकराव ठाकरे पूर्वी गृहराज्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना गुंडांविषयी अधिक माहिती असल्याचा टोला शरद पवारांनी लगावलाय. जर राष्ट्रवादी काँग्रेस गुंडांचा पक्ष असेल तर मागील आठ वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात ते राष्ट्रवादीबरोबर कशासाठी सत्तेत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Nov 5, 2012, 10:02 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव
एखाद्या पक्षात सर्वात जास्त गुन्हेगार शोधायचे झाल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सापडतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.
Nov 2, 2012, 06:30 PM ISTगडकरींना कायदेशीर नोटीस बजावणार - ठाकरे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गडकरींनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचही माणिकरावांनी सांगितलंय.
Oct 30, 2012, 08:04 PM ISTगडकरींनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.
Oct 29, 2012, 10:31 PM IST‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Oct 25, 2012, 09:38 PM ISTमाणिकरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जागा वाढवण्याची मागणी करेल, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागा वाढवून देण्याच्या राष्ट्रवादीच्या मागणीवर टीकास्त्र सोडलय.
Oct 22, 2012, 07:13 PM ISTमाणिकराव आणि गडकरींमध्ये `तू तू- मै मै`
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी केंद्राशी झालेल्या पत्रव्यवहाराचा वाद बराच रंगलाय. पत्र कोणी पाठवलं, यावरून वाद झडल्यानंतर आता ही पत्रं शेतक-यांच्या भल्यासाठी लिहिली की कंत्राटदारांच्या, यावरून तू-तू, मै-मै सुरू झालंय...
Oct 6, 2012, 08:48 PM IST