गोष्ट एका प्रामाणिक कंडक्टरची
मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस..... घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले.... तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले.... फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली..... ज्या क्षणी हे जाणवलं, त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली..... बॅगेत दोन लाख रुपये होते.... त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं.... बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं... बॅग गेली, पैसे गेले.... आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता....
Nov 27, 2017, 11:53 PM ISTमुंबई | गोष्ट एका प्रामाणिक कंडक्टरची
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 11:04 PM IST