प्राइम टाइम

मराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध

मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2015, 12:14 PM IST

सरकारने प्राईम टाइमची व्याख्या बदलली

मुंबई : मराठी सिनेमांच्या मल्टिप्लेक्समधल्या प्राईम टाईमबद्दल सरकारनं शब्द फिरवलाय. मराठी निर्माते आणि मल्टिप्लेक्स मालक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा प्राईम टाईमला बंधनकारक करण्याची घोषणा परवाच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी केली होती. पण दोन दिवसांतच सरकारनं या निर्णयाबद्दल एक पाऊल मागे घेतलंय.

Apr 9, 2015, 07:02 PM IST

मल्टीप्लेक्स सरकारचा दणका, मराठी चित्रपट प्राइम टाइमला

राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविणे आता बंधनकारक होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत दिली. 

Apr 7, 2015, 05:14 PM IST