टीम इंडियाच्या नेट सेशनमध्ये युवराजची अनुपस्थिती

येत्या एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघाने नेट प्रॅक्टिस केले. मात्र या नेट सेशनमध्ये युवराज सिंग अनुपस्थित होता. 

Updated: May 27, 2017, 04:47 PM IST
टीम इंडियाच्या नेट सेशनमध्ये युवराजची अनुपस्थिती title=

मुंबई : येत्या एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघाने नेट प्रॅक्टिस केले. मात्र या नेट सेशनमध्ये युवराज सिंग अनुपस्थित होता. 

लॉर्डच्या मैदानावर भारताच्या क्रिकेटपटूंनी जोरदार सराव केला. मात्र युवराज सिंग या सरावात नव्हता. रिपोर्टनुसार, युवराज सिंगला ताप आल्याने तो सरावात सहभागी होऊ शकला नसल्याचे म्हटले जातेय. 

दरम्यान, युवराजची तब्येत लवकरच सुधारेस असा विश्वास टीम मॅनेजमेंटने व्यक्त केलाय. दरम्यान स्पर्धा सुरु होण्याआधी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात युवराज संघात असणार की नाही याबाबतही अद्याप निश्चित झालेले नाहीये. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला मुकाबला ४ जूनला पाकिस्तानशी होणार आहे.