Women's T20 World Cup 2023: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या महिलांचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. अवघ्या 5 रन्सने टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सेमीफायनलच्या सामन्यात कॅन्टन इनिंग खेळली. कौरने 34 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. जेमिमाने हरमनप्रीतला चांगली साथ दिली होती. मात्र टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही.
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात 173 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 8 विकेट गमावून 167 रन्स केले. या सामन्यात भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक ठोकलं. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 24 बॉल्समध्ये 43 रन्स केले.
भारतीय टीमच्या 3 विकेट्स अवघ्या 28 रन्सवर पडल्या होत्या. ओपनर शेफाली वर्मा 9, स्मृती मंधाना 2 तर यास्तिका भाटिया 4 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी 69 रन्सची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियन टीमची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 172 रन्स केले. ओपनर बेथ मुनीने सर्वाधिक 54 रन्स केले. तिने 37 बॉल्समध्ये 7 फोर आणि 1 सिक्स लगावली. कर्णधार मेग लॅनिंगने 34 बॉल्समध्ये नाबाद 49 रन्स केले. भारताकडून शिखा पांडेने 2 तर दीप्ती शर्मा आणि राधा यादवने 1-1 विकेट घेतली.