पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर! एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार, 'तो' आहे तरी कोण?

जगात ट्रिलियनेअर होण्याची शर्यत सुरु झाली आहे. या शर्यतीत जो व्यक्ती आहे तो एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार आहे. जाणून घेऊया कोण आहे हा व्यक्ती. 

वनिता कांबळे | Updated: Jan 20, 2025, 06:14 PM IST
पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर! एक हजार अब्जाधीशांना लायकी दाखवणार, 'तो' आहे तरी कोण? title=

World First Trillionaire:  आतापर्यंत जगभरात चर्चा आहे ती अब्जाधीशांची. आता मात्र, या अब्जाधीस श्रीमंतांमध्ये शर्यत लागली आहे ती ट्रिलियनेअर होण्याची. ही शर्यात जो जिंकेलत तो पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर व्यक्ती असणार आहे. या ट्रिलियनेअरच्या संपत्तीचा आकडा मोजता मोजता बोबडी वळेल. जाणून घेऊया हा कोण व्यक्ती आहे जो या ट्रिलियनेअर होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. आणखी कोण कोण या शर्यतीत आहे ते जाणून घेऊया. 

इलॉन मस्क (Elon Musk) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे. इलॉन मस्क लवकरच स्वत:चाच रेकॉर्ड मोडून  एक हजार अब्जाधीशांना त्यांची लायकी दाखणार आहे. इलॉन मस्क पृथ्वीवरील पहिले ट्रिलियनेअर ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र,  इलॉन मस्क अगदी सहज ही शर्यत जिंकतील याची शक्यता फारच कमी आहे. कारण, या शर्यतीत असलेले इतर अब्जाधीश देखील तितकेच तगडे आहेत.  

Oxfam च्या रिपोर्टनुसार पुढील पाच वर्षांत जगाला पहिला ट्रिलियनियर मिळू शकतो. अहवालात दावा करण्यात आला आहे की पुढील दशकात किमान पाच अब्जाधीशांची संपत्ती $1 ट्रिलियनचा टप्पा पार करेल. ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार  इलॉन मस्क पृथ्वीवरील पहिले ट्रिलियनेअर होऊ शकतात.  ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार इलॉन मस्क यांची संपत्ती 447 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.  अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर सर्वात जास्त फायदा इलॉन मस्क यांना झाल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच टेस्लाचे शेअर्स वाढले आहेत.  ट्रम्प सरकार इलेक्ट्रिक वाहनांवरील कर क्रेडिट काढून टाकण्याच्या विचारात आहे. या मोठा फायदा  टेस्लाला कंपनीला होऊ शकतो. सेल्फ ड्रायव्हिंग कारला बूस्ट दिले जाईल. अशा अनेक योजनांचा अप्रत्यक्ष फायदा इलॉन मस्क यांना होऊ शकतो. यामुळे इलॉन मस्क हे पृथ्वीवरील पहिला ट्रिलियनेअर होऊ शकतात असे बोलले जात आहे. 

दरम्यान, ट्रिलियनेअर होण्याच्या या शर्यतीत  ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन आणि फ्रान्सचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अर्नल्ट हे देखील आहेत. 245 अब्ज डॉलर्सच्या संपत्ती मालक असलेले जेफ बेझोस जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. मार्क झुकरबर्ग 217 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे. लॅरी एलिसन आणि बर्नार्ड अर्नॉल्ट या दोघांची संपत्ती सुमारे188 अब्ज डॉलर इतकी आहे. 

जगातील 20 सर्वात श्रीमंतांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपतींचीही नावे आहेत. मुकेश अंबानी 94.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 17व्या स्थानावर आहेत, तर गौतम अदानी  76.0 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 19व्या स्थानावर आहेत. हे दोघेही ट्रिलियनेअरच्या शर्यतीपासून फार दूर आहेत.