दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने टीम इंडियामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅनजनेंटनुसार, शार्दुल ठाकूर हा सातव्या क्रमांकाचा फलंदाज नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान देता येणार नाही. भारतीय संघाचा मार्गदर्शक महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा कर्णधार असूनही पराभवानंतर संघात कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे पराभवानंतरही भारतीय संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे.
जोपर्यंत भारतीय संघातील खेळाडू जखमी होत नाही तोपर्यंत संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या संघ निवडीत धोनीचा प्रभाव निश्चितच आहे आणि संघात बदल करण्यास फारसा वाव नाही.
शार्दुलला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार असल्याने संघ व्यवस्थापनाचा कोणताही सदस्य हार्दिकच्या जागी शार्दुलला संधी देण्याच्या बाजूने नाही. त्याच्या गोलंदाजीचा विचार केल्यास तो नक्कीच विकेट घेण्यास सक्षम आहे. परंतु त्याने सुमारे नऊच्या इकोनॉमीने रन्स दिले आहेत.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सांगितले होतं की, "हार्दिक आयपीएलमध्येच गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल, परंतु त्याने या वर्षात आतापर्यंत भारत किंवा मुंबईसाठी एकही ओव्हर टाकलेली नाही. अशा स्थितीत त्याच्या संघातील स्थानाचाही प्रश्न निर्माण होतो. मात्र, भुवनेश्वरऐवजी शार्दुलचा संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती तंदुरुस्त असेल तर तोही संघात असेल याची खात्री आहे. त्याच्या अनुपस्थितीत अश्विनला संधी दिली जाऊ शकते.