T20 World Cup : भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) लॉर्ड्सवर खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा (Deepti Sharma) जगभरात चर्चेत होती. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नॉन स्ट्राईक एंडवर चार्ली जीन हिला धावबाद (मंकडींग) केले होते. याच पाश्वभूमीवर इंग्लंडच्या अनेक क्रिकेटपटूंनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, 1 ऑक्टोबरपासून जागतिक क्रिकेटमध्ये हा नियम लागू झाला आहे. नुकताच असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (aus vs eng) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा (Australia) वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) नॉन-स्ट्रायकर एंडवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (England captain Jos Buttler) इशारा दिला. यादरम्यान स्टार्कने भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फिरकीपटू दीप्ती शर्माच नाव घेतले. त्यामुळे पुन्हा एका मंकडिंगची चर्चा सुरु झालीय.
अशातच टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) उद्यापासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वीही मंकडिंग रन आऊटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) सुरू होण्यापूर्वी, या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 16 संघांच्या कर्णधारांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत मंकडिंगचा वापर करायचा की नाही याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मेगा प्रेस कॉन्फरन्स दरम्यान, जेव्हा कर्णधारांना विचारले गेले की त्यांच्या गोलंदाजांनी नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला धावबाद केले आहे, तेव्हा ते निर्णय स्विकारतील का? असा सवाल केला. तसेच मंकडिंगच्या समर्थनात असलेल्या कर्णधारांनी हात वर करावा असे पत्रकारांनी सांगितले. पण एकाही कर्णधाराने मंकडिंगच्या समर्थनार्थ हात वर केला नाही. मात्र, या प्रश्नावेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तिथे नव्हता. त्याचवेळी उर्वरित कर्णधारांनी आपण मंकडिंगला पाठिंबा देत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Video : "मी दीप्ती नाही पण..."; मिचेल स्टार्कने इंग्लडच्या खेळाडूला दिला इशारा
अॅरॉन फिंचने मंकडिंगवर मांडलं मत
ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचला मंकडिंग आवडत नाही असे त्याने म्हटलं आहे. शुक्रवारी पावसामुळे रद्द झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने क्रीज सोडण्यावरुन इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला मंकडिंग करण्याचा इशारा दिला होता. इशारा दिल्यानंतर कुणी ऐकले नाही, तर ते योग्य आहे. पण मला ते आवडत नाही, असे फिंचने म्हटलं आहे.
कोणालाही असा खेळ पाहायचा नाही - जोस बटलर
रन आऊटची ही पद्धत आतापर्यंत अयोग्य पद्धतीने ठेवण्यात आली होती. पण ऑक्टोबरपासून लागू झालेल्या आयसीसी (ICC) नियमानुसार ते रनआउट म्हणून वर्गीकृत केले जाईल. एमसीसीने मँकाडिंगला धावबाद म्हणून मान्यता दिली असली तरी, इंग्लंडचा कर्णधार बटलरनेही (Jos Buttler) ही पद्धत योग्य नसल्याचे म्हटलं आहे. कोणालाही अशा पद्धतीचा खेळ पाहायचा नाही. कारण यामध्ये बॅट आणि बॉलने कामगिरी करण्याऐवजी त्यावर चर्चा सुरू होते, असे बटलर म्हणाला.