Shubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...

Shubman Gill : भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. मात्र  शुभमन गिलच्या शानदार सेंच्युरीमुळे त्याने आपल्या खेळाने एक नवी उंची गाठली आहे. 

Updated: Feb 2, 2023, 12:39 PM IST
Shubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...  title=
Shubman Gill on Twitter

India vs New Zealand Shubman Gill: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-20 (Ind vs Nz T20) मालिकेतील शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना 168 धावांनी जिंकला. 235 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 66 धावांमध्ये आटोपला. मात्र भारताचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. काल (1 फेब्रुवारी) न्यूझीलंडच्या बॉलर्सना अक्षरक्ष: कुटून काढलं. शुभमन गिल याने काल शानदार सेंच्युरी झळकावली. प्रत्येक सामन्यानिशी शुभमन गिल आपल्या खेळाने एक नवी उंची गाठतोय. या खेळानंतर शुभमन गिल याने भारतासाठी भावनिक पोस्ट केली आहे.

शुभमन गिलची भारतासाठी भावनिक पोस्ट

भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने 63 चेडूंमध्ये 126 धावा करत भारताला 234 धावांपर्यंत मजल मारण्यास मदत केली. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. गिलने शतक झळकावताच अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहली या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले. तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल हा भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळले आहेत. गिल याने बांग्लादेशविरुद्ध कसोटी शतक, श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय शतक आणि न्यूझीलंडविरुद्ध टी- 20 शतक झळकावले आहे. या शतकानंतर शुभमन गिलने This one was special  ने असं म्हणत भारतासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

शुभमन गिलने गेल्या 17 दिवसांतील हे चौथे आंतरराष्ट्रीय शतक केले. याआधी शुभमनने वनडे फॉरमॅटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या वर्षी 15 जानेवारीला शुभमनने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 116 धावा केल्या होत्या, त्यानंतर 18 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 208 धावा केल्या होत्या. 24 जानेवारीला शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध 112 धावा केल्या होत्या. आता त्याने टी-20 मध्ये शतक झळकावले आहे. या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केल्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
 

वाचा: 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक 

शुभमन गिल कोणाला डेट करतो?

नेटकऱ्यांच्या सोशल मीडियावरील व्हायरल मिम्सनंतर शुभमन गिल (Shubman Gill) सारा अली खानलाही डेट करत होता का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सारा अली खानच्या आधी सारा तेंडुलकरला लग्न करण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर दिला आहे.  भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं नाव अनेकदा जोडलं गेलं आहे. त्यांना अनेकदा स्पॉट करण्यात आले आहे. या नात्यावर अद्याप अधिकृत कुणीही बोललेलं नाही. पण त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केल्यामुळे अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत.