शोएब अख्तरला विरू म्हणाला, 'तू बॉलिंग करतोस की भीक मागतोस?'

'तू बॉलिंग करतोय की भीक मागतोय' विरेंद्र सेहवाग का आणि कोणाला म्हणाला? नेमकं काय घडलं?

Updated: Jul 14, 2021, 08:13 PM IST
शोएब अख्तरला विरू म्हणाला, 'तू बॉलिंग करतोस की भीक मागतोस?' title=

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे चाहत्यांची पर्वणी. हा सामना क्रिकेटप्रेमींपुरता मर्यादीत न राहता देशप्रेमापर्यंत अनेकदा पोहोचतो. त्यामध्ये अनेक किस्सेही घडत असतात. पाकिस्तानच्या दिग्गज माजी बॉलर आणि टीम इंडियाचा फलंदाज यांच्यातील एक किस्सा संजय मांजरेकर यांनी शेअर केला आहे. 

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या बॅट आणि किस्सांमुळे विरोधी संघाच्या गोलंदाजांना खूप त्रास द्यायचा. सेहवाग निर्भयपणे कोणत्याही गोलंदाजाचा सामना करत असे. 2004 मध्ये टीम इंडिया राहुल द्रविडच्या नेतृत्वात पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेली होती. ऐतिहासिक 3 सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने 2-1 ने जिंकली, जिचा पहिला कसोटी सामना मुल्तानमध्ये खेळला गेला. 

मुल्तानमध्ये सेहवागने 309 धावा केल्या होत्या आणि भारताने डाव आणि 52 धावांनी सामना जिंकला होता. या खेळीनंतर सेहवागला मुल्तानचा सुलतान म्हणून ओळखले जाऊ लागला. या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब अख्तरला सेहवागने त्रास दिला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने सेहवाग आणि शोएब यांच्यात एक किस्सा सांगितला आहे, जो अगदी मजेदार आहे.

2004 मधील मुल्तान कसोटी सामन्यात सेहवागने तिहेरी शतक ठोकलं होतं. सेहवागच्या या खेळीदरम्यान शोएब अख्तर फारच अस्वस्थ झाला आणि मग बाऊन्सर टाकायला सुरुवात केली. त्यानंतर सेहवागने 200 हून अधिक धावा केल्या होत्या आणि प्रत्येक बाउन्सरवर आऊट होऊ नये म्हणून प्रयत्न करत होता.

या सामन्यात अख्तरने सेहवागला उसकवण्याचा प्रयत्न केला. 200 पेक्षा जास्त धावा केल्या इतके बाउन्सर टाकले तर एकतरी पुल शॉट मारून दाखव.  'सेहवाग शोएबला उत्तर म्हणून म्हणाला, तू बॉलिंग करतोस की भीक मागतोस?' संजय मांजरेकर पुढे म्हणाले की, सेहवागनं यावर तोडीसतोड उत्तर दिलं.  सेहवाग म्हणाला, तू गोलंदाजी करतोस की भीक मागतोस?' सेहवागनं ट्रिपल सेंच्युरी केली होती. तर सचिन तेंडुलकरनं नाबाद 194 धावा केल्या होत्या. या सामन्यात सेहवागला प्लेअर ऑफ मॅच देखील मिळालं होतं.