बॉलिवूड कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

Tiku Talsania: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 11, 2025, 01:30 PM IST
बॉलिवूड कलाकार टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर  title=

आपल्या विनोदी टायमिंगसाठी आणि अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, अभिनेत्याला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी चित्रपट आणि दूरदर्शन दोन्हीमध्ये काम केले. टीकू तलसानियाने 'अंदाज अपना अपना', 'देवदास', 'स्पेशल 26' आणि लोकप्रिय टीव्ही शो 'उत्तरन' सारख्या क्लासिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची तब्येत ठीक नव्हती, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. परंतु डॉक्टर अजूनही त्यांना निरीक्षणाखाली ठेवत आहेत आणि अभिनेत्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

सविस्तर बातमी थोड्यावेळात....