युवा क्रिकेटर रियान परागला (Riyan Parag) भारतीय संघाचं भवितव्य म्हणून पाहिलं जातं. रियान पराग सोशल मीडिया नेहमी काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो. कधी आपला परफॉर्मन्स तर कधी आपल्या इतर गोष्टींमुळे तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. आयपीएल 2024 नंतर लाईव्ह स्ट्रीम करताना रियाग परागकडून चुकून त्याची सर्च हिस्ट्री सोशल मीडियावर लीक झाली होती. दरम्यान अखेर त्याने यावर आपलं मौन सोडलं आहे.
City1016 Radio शी संवाद साधताना रियान परागने आयपीएलच्या आधी झालेल्या या घटनेवर भाष्य केलं. मागील आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
"मी आयपीएल संपवलं होतं. आम्ही चेन्नईत होतो आणि सामना संपवला. मी माझ्या स्ट्रीमिंग टीमसोबत डिस्कॉर्ड कॉलवर गेलो आणि आता त्याची प्रसिद्धी झाली. पण ते आयपीएलच्या आधी घडले. माझ्या डिस्कॉर्ड टीममधील एका व्यक्तीने आयपीएलच्या आधी मला सेट करण्याचा प्रयत्न केला, पण ते खूप लवकर बंद झाले. पण नंतर आयपीएल नंतर, प्रचार सुरू झाला आणि माझा हंगाम चांगला गेला. मी येऊन माझा स्ट्रीम सुरु केलं. माझ्याकडे स्पॉटीफाय किंवा अॅपल म्युझिक नव्हते. सर्व काही हटवले गेले," असं परागने मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.
Riyan Parag is only 22 years old. We all did such things at that age.
But Ananya Pandey Hot
Totally disappointed. pic.twitter.com/jvIsGz2Lqt
— Incognito (@Incognito_qfs) May 27, 2024
हा विषय खूपच जास्त प्रमाणात मांडण्यात आला होता आणि सार्वजनिकरित्या स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं वाटलं नाही असं त्याने म्हटलं. "मी गाणी ऐकण्यासाठी YouTube वर गेलो आणि ते शोधत होतो. पण काय चाललं आहे हे मला कळले नाही, पण एकदा मी स्ट्रीम संपवला, तेव्हा मला वाटलं की अरेरे! हे काय घडलं. ते खूपच जास्त प्रमाणात मांडण्यात आले. मला वाटलं नाही की मी सार्वजनिकरित्या जाऊन स्पष्टीकरण देण्यासाठी हे पुरेसे चांगले कारण आहे. कोणीही समजून घेणार नाही," असं तो पुढे म्हणाला.
Riyan Parag talking about his search history controversy for the first time
(Video Credit-City1016) pic.twitter.com/6PyXMIYHYF
— Rohit Baliyan (@rohit_balyan) February 11, 2025
जर तुम्हाला काय झालं माहिती नसेल तर, , परागच्या कॉम्प्युटरवरील सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांच्याशी संबंधित स्पष्ट सर्च दाखवले गेले. पराग सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी एक महत्त्वाचा क्रिकेटपटू आहे. "आसाममधून आल्यानंतर भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न होते. मी खरोखर आनंदी आहे. झिम्बाब्वेमध्ये माझा पहिला सामना खेळणे खास असेल," अशी भावना त्याने मांडली आहे.