जामनगर : स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातची विधानसभा निवडणूक लढवणार आहे. भाजपने रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा जडेजाने सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ज्यामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तुम्हाला रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत.
निवडणूक प्रतिज्ञापत्रात रिवाबा जडेजाने सांगितले की, तिच्याकडे 97 कोटींहून अधिक संपत्ती आहे. ज्यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने आहेत. या मालमत्तेत जमीन, प्लॉट आणि घर यांचाही समावेश आहे.
तसेच याच प्रतिज्ञापत्रात जडेजाने 2021-22 मध्ये 18.56 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. रवींद्र जडेजाकडे एकूण 37.43 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि रिवाबाकडे 62.35 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्याचवेळी, क्रिकेटरकडे 33.5 कोटी रुपयांची स्थिर संपत्ती देखील आहे. ज्यामध्ये प्लॉट, आलिशान घर आणि शेतजमिनीचा समावेश आहे. तसेच या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 26.25 कोटी रुपयांची कौटुंबिक जंगम मालमत्ता जाहीर केली आहे.
रवींद्र जडेजाच्या नावावर तीन आलिशान कार आहेत. ज्यामध्ये ऑडी, फोर्ड एंडेव्हर आणि WV पोलो GTI यांचा समावेश आहे. या तिघांची किंमत सुमारे दीड कोटी आहे. त्याचवेळी रिवाबाकडे कोणतेही वाहन नाही.
रिवाबाकडे 34.80 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 14.80 लाख रुपयांचे हिरे आणि 8 लाख रुपयांचे चांदीचे दागिने आहेत. तर रवींद्रकडे २३.४३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
दरम्यान या निवडणूकीत रविंद्र जडेजा रिवाबाला खुप साथ देत आहे. तिच्या निवडणूक रॅलीत सामील होत आहे. आता ही निवडणूक ती जिंकते का हे पाहावे लागणार आहे.