धरमशाला : भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी धरमशालेमध्ये पोहोचलाय. येथे पोहोचताच अनेक खेळाडूंनी हिमाचल प्रदेशमधील आल्हाहदायक वातावरणाचे फोटोही टाकले.
प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी हॉटेलच्या बाहेरचा एक फोटो ट्विटरवर टाकलाय. हा फोटो पोस्ट करताना रवी शास्त्री म्हणाले, धरमशालेमध्ये आरामात श्वास घ्या. शास्त्री यांनी असे ट्विट करताना श्रीलंकेच्या संघाला जणू चिमटाच काढलाय.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा संघ मास्क लावून खेळला होता. याप्रकरणी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रारही केली होती.
Breathe easy in Dharamsala #TeamIndia #INDvSL pic.twitter.com/DpvQZ7KQfq
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) December 8, 2017
That jibe!
— Maruf Shaikh (@marrufff) December 8, 2017
Well said sir. Fitting reply
— SUNDAR (@sundar220) December 8, 2017
Well said!
— sampada2346 (@sampada2346) December 8, 2017
haha haha they will face the same problem my seeing our batsmen in Dharamsala
— santosh (@iamsantoshnani) December 8, 2017
दरम्यान, पर्वतीय भाग असल्याने हिमाचल प्रदेशमधील हवामान साधारण साफ असते. दरम्यान तीन वनडे सीरिजदरम्यान रविवारी होत असलेल्या सामन्यात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान विभागाने येथे पाऊस तसेच हिमवृष्टीची शक्यता वर्तवली होती.