Pakistan vs Bangaladesh Test : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात 10 गडी राखून पराभूत करणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला. 448 धावांवर पहिला डाव घोषित करण्याचा धडाकीचा निर्णय कॅप्टन शान मसूदने घेतला होता. मात्र, हाच निर्णय पाकिस्तानच्या अंगलटी आल्याचं दिसून आलंय. अशातच आता पराभवानंतर पाकिस्तानवर जोरदार टीका होताना दिसतीये. त्यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी देखील तोंडसूख घेतलं आहे.
पाकिस्तान संघाने पहिली चूक केली, ती म्हणजे संघ चुकीचा निवडला. हा संघ स्पिनरशिवाय मैदानात उतरला होता, त्यामुळे त्याचा फटका पाकिस्तानला बसलाय. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या वेगवाग गोलंदाजांनी आपली प्रतिष्ठा गमावली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये जेव्हा फास्टर गोलंदाजांची धुलाई केली, तेव्हापासून फास्टर गोलंदाजांचं मनोबल खालावलं गेलं. जगात त्यांची नाचक्की केली. पाकिस्तान त्यांच्या फास्टर गोलंदाजांसाठी ओळखलं जातं. पण बांगलादेशविरुद्ध गरज नसताना फास्टर गोलंदाज खेळवले गेले अन् खेळ पलटला, असं रमीझ राजा म्हणाले.
तुम्हाला पीच कंडिशन नीट समजलीच नाही. फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली नाही आणि गोलंदाजांनीही अत्यंत खराब कामगिरी केली. आधीच पाकिस्तानचा संघ तणावाखाली आहे. आता मालिका गमावली म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये तणाव निर्माण होईल, बरीच टीका आणि प्रश्न उपस्थित होतील, असंही रमीझ राजा यांनी म्हटलं आहे. रमीझ राजा यांनी यावेळी कॅप्टन शानवर देखील टीका केली. आधी फलंदाजी करत नंतर कॅप्टन हो, अशा शब्दात रमीझ राजाने पाकिस्तानला सुनावलं आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेटला काय झालंय? जेव्हा मी पीएसएल खेळलो तेव्हा त्या लीगचा दर्जा जबरदस्त होता, खेळाडूंची कामाची नीती खूप चांगली होती आणि युवा खेळाडूंमध्ये जादू होती. पण आता त्यांचं काय चाललंय? असा सवाल केविन पीटरसनने विचारला आहे. बांगलादेशविरुद्ध स्लो ओव्हररेटमुळे पाकिस्तानने 6 WTC पॉइंट्स काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे देखील शान मसूदवर टीका होताना दिसतीये.