दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची आघाडी पोहोचली ३०० पार, टीम इंडियावर घोंगावतंय पराभवाचं संकट

India Vs New Zealand 2nd Test Day 2: टीम इंडिया मालिकेत पुनरागमन करण्यासाठी इतिहास रचावा लागणार आहे. 300 हुन अधिक धावसंख्या भारताने फक्त एकदाच केला होता.

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 25, 2024, 06:33 PM IST
दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची आघाडी पोहोचली ३०० पार, टीम इंडियावर घोंगावतंय पराभवाचं संकट title=

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड पुणे कसोटीचा आज (२५ ऑक्टोबर) दुसरा दिवस होता. न्यूझीलंडने दिवसभर अप्रतिम कामगिरी करत भारताला चांगलेच बॅकफूटवर ढकले आहे. न्यूझीलंड टीम ने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने 5 गडी गमावून 198 धावा असा खेळ खेळला. दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाचा पहिला डाव 156 धावांवरच मर्यादित राहिला तर न्यूझीलंडच्या संघांने हिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे न्यूझीलंडला डावात 103 धावांची आघाडी मिळाली. अशाप्रकारे  दुसऱ्या डावात न्यूझीलंड संघाची एकूण आघाडी 301 धावांची झाली आहे. अजून तीन दिवसांचा खेळ बाकी आहे. परंतु चेंडू ज्या पद्धतीने फिरत आहे, त्यामुळे चौथ्या डावात 300 च्या वरच्या कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करणे टीम इंडियासाठी सोपे जाणार नाही.

टॉम लॅथमचे शतक हुकले

न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमची विकेट घेऊन भारतीय संघाला मोठे यश मिळाले. टॉम लॅथम ८६ धावा करून बाद झाला. त्याची विकेट वॉशिंग्टन सुंदरने घेतली. 

न्यूझीलंडला आहे इतिहास रचण्याची संधी 

न्यूझीलंड 68 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतात ऐतिहासिक पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटच्या कसोटी मालिकेमध्ये बेंगळुरूमध्येच घरच्या भूमीवर भारतीय संघ ४६ धावांवर बाद झाला आणि ३६ वर्षात न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.

फक्त एकदाच केलं होतं 300 हुन अधिक धावांचे लक्ष्य पार 

300 हुन अधिक धावांचे लक्ष्य भारतासाठी सोपे नसेल. याआधी भारताच्या भूमीवर टीमला 300 हुन अधिक लक्ष्याचा फक्त एकदाच पाठलाग करण्यात यश आलं आहे. 2008 मध्ये चेन्नईमध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध 387 धावा केल्या आणि सामना जिंकला. 

तिसऱ्या दिवशी भारतीय संघाला करावी लागणार आश्चर्यकारक कामगिरी

भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच न्यूझीलंडविरुद्ध उत्तम गोलंदाजी करावी लागणार आहे. या संपूर्ण सामन्यात आतापर्यंत केवळ सुंदर आणि अश्विनलाच विकेट मिळाल्या आहेत, तर अजूनही बुमराह, जडेजा आणि आकाश दीप यांना विकेट्स मिळाल्या नाहीयेत. या गोलंदाजाना विकेट्सचे खाते उघडावे लागले आहे. जर त्यांना चांगली गोलंदाजी करता आली तर ही भारतीय टीमसाठी चांगली बातमी मिळेल.