23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग

दुसऱ्या टेस्ट सामन्यात तरी टीम इंडिया न्यूझीलंडवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडिया न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर 156 धावांवर ऑल आउट झाली. 

पुजा पवार | Updated: Oct 25, 2024, 03:54 PM IST
23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS NZ 2nd Test : बंगळुरू टेस्ट सामन्यात न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभूत झालेल्या टीम इंडियाच्या नावावर अनेक लाजिरवाणे रेकॉर्डस् नोंदवले गेले. दुसऱ्या टेस्ट सामन्यात तरी टीम इंडिया न्यूझीलंडवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर 156 धावांवर ऑल आउट झाली. यासह पुन्हा एकदा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला गेला. 

2001 नंतर पहिल्यांदाच असं झालं : 

न्यूझीलंडने टॉस जिंकून फलंदाजी करताना 10 विकेट्स गमावून 259 धावांची आघाडी घेतली होती. मात्र टीम इंडिया ही आघाडी मोडीत काढण्यात अयशस्वी ठरली आणि केवळ 156 धावांवर ऑल आउट झाली. 2001 च्या नंतर टीम इंडियाच्या टेस्ट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की टीम इंडियाला भारतात खेळताना विदेशी संघाविरुद्ध लागोपाठ दोन टेस्टमध्ये 100 हुन अधिक धावांची पिछाडी मिळाली. यापूर्वी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध असे घडले होते. जेव्हा विदेशी संघाने वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात टीम इंडिया 173 धावांनी तर ईडन गार्डन्सवर 274 धावांनी पिछाडीवर होती.

टीम इंडियाची फ्लॉप खेळी : 

पुणे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांपैकी शुभमन गिल 30 धावा करून बाद झाला तर त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला 9 बॉलचा सामना करून केवळ 1 धाव करणे शक्य झाले. त्यानंतर रवींद्र जडेजा वगळता इतर कोणताही फलंदाज मैदानात तग धरू शकला नाही. भारताकडून यशस्वी जयस्वाल 30, ऋषभ पंत 18, सरफराज खान 11, रवींद्र जडेजा 38 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 18 धावा केल्या. तर इतर कोणालाही दोन अंकी धाव संख्या करणे देखील शक्य झाले नाही. त्यामुळे टीम इंडिया 156 धावांवर ऑल आउट झाली. 

हेही वाचा : Video : विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले

मिचेल सँटनरने घेतल्या 7 विकेट्स : 

टीम इंडियाचा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या 7 विकेट्स घेऊन फलंदाजांना घाम फोडला होता. तर दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा गोलंदाज  मिचेल सँटनरने टीम इंडियाचा 7 विकेट्स घेऊन फलंदाजांना लोळवलं. मिचेल सँटनरने भारताच्या शुभमन गिल, विराट कोहली, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह यांची विकेट घेतली. 

पुणे टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेईंग : 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप.