Sachin Tendulkar World Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेनंतर क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे ती एकदिवसीय क्रिकेच विश्वचषक स्पर्धेची (ODI WC 2023). 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा ही स्पर्धा भारतात होणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक खास प्लान केला आहे. भारतातल्या स्टार आयकॉन्सना या स्पर्धेला निमंत्रित करण्यासाठी बीसीसीआयने एक विशेष तिकिट बनवलं आहे. या तिकिटाला 'गोल्डन तिकिट फॉर इंडिया आयकॉन्स' (Golden Ticket) असं नाव देण्यात आलं आहे. या तिकिटाचा पहिला मान देशाचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना देण्यात आला. विश्वषचक स्पर्धेचं पहिलं गोल्डन तिकिट अमिताभ बच्चन यांना सन्मानपूर्वक दिलं गेलं. त्यानंतर आता दुसरं तिकिट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना देण्यात आलं.
बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन विश्वचषक स्पर्धेचं गोल्डन तिकिट त्यांना सुपूर्द केलं. याचा फोटो बीसीसीआने एक्सवर शेअर केला आहे. या फोटोला बीसीसीआयने एक कॅप्शनही दिलं आहे. यात म्हटलंय. 'हा एक खास क्षण आहे, 'गोल्डन तिकिट फॉर इंडिया आयकॉन्स' कार्यक्रमांतर्गत बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकिट दिलं'
An iconic moment for cricket and the nation!
As part of our "Golden Ticket for India Icons" programme, BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Bharat Ratna Shri @sachin_rt.
A symbol of cricketing excellence and national pride, Sachin Tendulkar's… pic.twitter.com/qDdN3S1t9q
— BCCI (@BCCI) September 8, 2023
कधी आहे विश्वचषक स्पर्धा
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड संघादरम्यान स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाणार आहे. तर यजमान टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वात चुरशीचा ठरणारा भारत-पाकिस्तानदरम्यानचा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. याच मैदानावर 19 नोव्हेंबरला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामनाही होणार आहे.
विश्व कप 2023 साठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक:
8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
14 ऑक्टोबर विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बंगळुरु