IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral

MS Dhoni Video: स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध PAK सामन्याबद्दलचा आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 10, 2025, 11:13 AM IST
IND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral  title=

MS Dhoni cheers for Team India: महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) या नावाला परिचयाची गरज नाही. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणजे धोनी. धोनीला कॅप्टन कुल म्हणूनही ओळखले जाते. धोनीने 2011 एकदिवसीय विश्वचषक, 2007 टी20 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तीन आशियाई कप ट्रॉफी जिंकून भारताला मान मिळवून दिला आहे. शिवाय महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघातील कर्णधारपद तर सिद्ध केलेच, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने आयपीएलमध्येही कर्णधारपद सिद्ध केले.

पाच वेळा मिळवले आयपीएलचे जेतेपद

सीएसकेचा कर्णधार असताना धोनीने पाच वेळा संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी चाहत्यांचा त्याच्याबद्दल असलेला आदर आणि प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही हे वेळोवेळी दिसून येते. धोनीच्या प्रत्येक व्हिडिओला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळते. अलीकडेच, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाचा जयजयकार करताना दिसत आहे.

हे ही वाचा: Video: गिलच्या गरुडासारख्या नजरेतून चेंडू सुटू शकला नाही, 'सुपरमॅन' बनून घेतला झेल

 

धोनीने IND Vs PAK सामन्यापूर्वी टीम इंडियाचे वाढवले मनोबल 

धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ स्टार स्पोर्ट्सने आपल्या वेबसाइटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ ICC पुरूष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या भारत-पाकिस्तान  या हाय-व्होल्टेज सामन्याबद्दलचा आहे, ज्यामध्ये धोनी त्याच्या 'कूल' स्टाईलने सर्वांचे मन जिंकत आहे.

हे ही वाचा: महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार जगातील सर्वात मोठा भूजल पुनर्भरण प्रकल्प, 73 गावांना होणार फायदा

 

मनोरंजक घोषणा देताना दिसला कॅप्टन कूल

यावेळी, कॅप्टन कूल धोनी भारताची जर्सी आणि पांढरे जॅकेट परिधान करून चाहत्यांसह मनोरंजक घोषणा देताना दिसत आहे.  धोनीने या घोषणा दिल्या-

  • आसमान में छाएगा, कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा
  • आसमान में कितने तारे, टूटेंगे टीवी उनके सारे!
  • अपना नंबर अगला है, 2017 का बदला लेना है
  • जोर से बोलो- इंडिया, इंडिया, सारे बोलो- इंडिया- इंडिया

हे ही वाचा: लग्नाची तारीख ठरली, वधूही तयार झाली... पण 'या' क्रिकेटपटूने संघासाठी केला मोठा त्याग

 

यादरम्यान धोनीने व्हिडीओच्या शेवटी सांगितले की, आता भारत-पाकिस्तान सामन्यात मजा येईल.