T20 World Cup Pakistan Squad : ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 16 ऑक्टोंबरपासून T20 विश्वचषकाच्या थराराला सुरूवात होणार आहे. जवळपास प्रत्येक देशाच्या संघाने आपल्या शिलेदारांची यादी जाहीर केली आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्ताननेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. मात्र यावर पाकिस्तानचाच माजी खेळाडू मोहम्मद आमिरने केलेल्या ट्विटमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Mohammad Amir on Pakistan T-20 World Cup Team Selection)
मोहम्मद आमिरने त्याच्या ट्विटमध्ये, चीफ सेलेक्टर की चीप सेलेक्शन असं म्हटलं आहे. पाकिस्तानने विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला संघ हा खराब असल्याचं मोहम्मद आमिरचं म्हणणं आहे. मोहम्मद आमिरच्या ट्विटनंतर त्याच्यावरच निशाणा साधला आहे. मोहम्मद आमिरला सट्टेबाज म्हणत त्यालाच क्रीडाप्रेमींना घेरलं आहे.
मोहम्मद आमिरने निवृत्ती घेताना पाकिस्तानच्या निवड समितीवर गंभीर आरोप केले होते. टीम प्रशासनाच्या मानसिक छळाला कंटाळून आपण निवृत्ती घेतल्याचं आमिरने म्हटलं आहे. त्याने वयाच्या 28 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. आमिरने पाकिस्तानसाठी 36 टेस्टमध्ये 119, 61 वनडेमध्ये 81 आणि 50 टी-20 मॅचमध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत.
chief slector ki cheap selection
— Mohammad Amir (@iamamirofficial) September 15, 2022
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम पाकिस्तान-
बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.
राखीव खेळाडू : फखर जमान, मोहम्मद हारिस आणि शाहनवाज दहानी.