मुंबई : चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली. चेन्नईला पहिल्या 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा या मोसमातील चौथा सामना हा सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन रवींद्र जाडेजासमोर (Ravindra Jadeja) स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे. (ipl 2022 csk ravindra jadeja will have to prove himself as captain said ravi shastri)
आतापर्यंत जडेजा कर्णधार म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही. टीम इंडियाच्या दिग्ग्जांनीही जाडेजाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हरभजन सिंगनंतर आत रवी शास्त्री यांनीही वाटतंय की जाडेजा कॅप्टन्सी करण्यासाठी संकोच करतोय. जाडेजाला पुढे येत संघाचं नेतृत्व कराव लागणार आहे.
जाडेजाला कॅप्टन म्हणून स्वत:ला सिद्ध करावं लागेल. तसेच टीममधील खेळाडूंवर सकारात्मक प्रभाव पाडावा लागेल, असं शास्त्री ईसपीएनक्रिकइंफोसोबत बोलताना म्हणाले.
"याने खूप फरक पडतो. तुम्ही आयपीएलमध्ये सर्वोत्तम कर्णधाराची जागा घेतली आहे. तर तुम्हाच्याकडून धोनीसारखी कॅप्टन्सीची अपेक्षा ठेवणंही योग्य आहे. पण धोनीची जागा घेणं साधं काम नाही", असं शास्त्री म्हणाले.
"मला वाटतं की जाडेजाने स्वत:ला कॅप्टन म्हणून सिद्ध करावं. मला वाटतं जाडेजा यातून काढता पाय घेतोय. जाडेजाने आपल्या सहकाऱ्यांसह अधिकाअधिक संवाद साधायला हवा. तसेच मैदानात जे सुरु आहे, त्यात स्वत:ला झोकून द्यायला हवं. नव्या कर्णधाराला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला असे प्रयोग करायला हवेत. कारण एकदा का कॅप्टन म्हणून बॉडी लँग्वेज दाखवायला लागली की बाकीच्या टीमवर त्याचा परिणाम होतो", असंही शास्त्री यांनी नमूद केलं.
रवींद्र जाडेजा कॅप्टन आणि खेळाडू या दोन्ही भूमिकेत अपयशी ठरला आहे. जाडेजाला पंजाब विरुद्धच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित 2 सामन्यांमध्ये त्याने 17 आणि नाबाद 26 धावांची खेळी केली.