यूएई : आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 33 वा सामना (IPL 2021 Delhi vs Hyderabad 33rd Match Result) दिल्ली कॅपिट्ल्स (DC) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादचा 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीने हे विजयी आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात 13 चेंडूआधी पूर्ण केलं. (ipl 2021 dl vs srh shikhar dhawan becomes 3rd batsman who consecutive scored 600 plus runs in 6 seasons)
दिल्लीकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक नाबाद 47 धावा केल्या. तर कॅप्टन रिषभ पंतने (Rishbh Pant) नॉट आऊट 35 रन्स केल्या. या जोडीने दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. दिल्लीचा या मोसमातील हा 7 वा विजय ठरला. दिल्लीने यासह पॉइंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. (ipl 2021 dl vs srh shikhar dhawan becomes 3rd batsman who consecutive scored 600 plus runs in 6 seasons)
दरम्यान या सामन्यात शिखर धवननेही (Shikhar Dhwan) 42 धावा कुटल्या. धवनने या खेळीसह अनोखा कारनामा केला. तसेच आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला मागे टाकलं.
गब्बरचा जब्बर धमाका
शिखरने आयपीएलमध्ये सलग 6 व्यांदा तर एकूण 8 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला. धवनने याआधी अनुक्रमे 2016 पासून 2020 पर्यंत प्रत्येक मोसमात 400 पेक्षा अधिक धावांची नोंद केली आहे.
सलग सर्वाधिक वेळा 400 प्लस धावा करण्याबाबत चेन्नईचा सुरेश रैना आणि हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहे. या दोघांनी सलग 7 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याचा कारनामा केला आहे. तर सर्वाधिक वेळा 400 प्लस धावा करण्याचा रेकॉर्ड रैनाच्या नावे आहे. रैनाने एकूण 9 वेळा 400+ धावा केल्या आहेत.
विराट, रोहित आणि वॉर्नरला पछाडलं
शिखरने आठव्यांदा 400 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला. यासह त्याने रोहित, वॉर्नर आणि विराटला मागे टाकलं. या तिघांच्यान नावे आयपीएलच्या 7 मोसमांमध्ये 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची नोंद आहे. धवनने 2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019, 2020 आणि आता 2021 मध्ये हा भीमपराक्रम केलाय.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार
धवनने हैदराबाद विरुद्ध 42 धावांच्या खेळीत 1 सिक्स आणि 6 फोर ठोकले. यासह त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. शिखर आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज ठरला. धवनच्या नावे आयपीएलमध्ये आता 640 चौकारांची नोंद आहे. तर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विराट आहे. विराटने 525 फोर मारले आहेत.
4️0️0️ runs and counting for the season
Gabbar, you beauty #DCvSRH #YehHaiNayiDilli #IPL2021 pic.twitter.com/dXrAXhiRyr
— Delhi Capitals (@DelhiCapitals) September 22, 2021