सीरिज जिंकण्यासाठी भारताला हव्या २०६ रन्स, पाहा LIVE SCORE

पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी २०६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.

Updated: Jul 6, 2017, 11:10 PM IST
सीरिज जिंकण्यासाठी भारताला हव्या २०६ रन्स, पाहा LIVE SCORE

किंगस्टन : पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी २०६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेण्याचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट इंडिजला ५० ओव्हरर्समध्ये २०५/९ एवढा स्कोअर करता आला. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर उमेश यादवला तीन विकेट मिळाल्या. हार्दिक पांड्या आणि केदार जाधवला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळालं. वेस्ट इंडिजच्या शाय होपनं ५१ रन्स तर कायल होपनं ४६ रन्स बनवल्या.

पाच वनडेच्या या सीरिजमधली पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. चौथी वनडे जिंकण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. त्यामुळे सीरिज जिंकण्याची चांगली संधी भारताला आहे.

LIVE SCORE पाहण्यासाठी इथे क्लिक करा