IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा (115) च्या शतकानंतरही भारताने 13 धावांनी हा सामना जिंकला. या विजयानंतर भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप दिला.
भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 290 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 8 गड्यांच्या मोबदल्यात 289 धावा केल्या. प्रत्युत्तरात सिकंदर रझा (115) याच्या शतकानंतरही झिम्बाब्वेचा संघ 49.3 षटकांत 276 धावांत सर्वबाद झाला.
विजयानंतर भारतीय संघाने जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर नाचून आनंद साजरा करत आहेत. व्हिडीओमध्ये धवन काळा चष्मा घालून संघासोबत डान्स करताना दिसत आहे. त्याच्यासोबत टीमचे बाकीचे खेळाडूही 'काला चष्मा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघासमोर 289 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. यामध्ये गिलने अवघ्या 97 चेंडूंमध्ये 130 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये त्याने खणखणीत 15 चौकार आणि 1 षटकार खेचला. त्यासोबतच इशान किशनने अर्धशतकी खेळी करत धावसंख्या वाढवण्यात हातभार दिला.
झिम्बाब्वेसोबतच सामना अंतिम षटकापर्यंत गेला होता. सिकंदर रझाने एक बाजू लावून धरली होती. सामना पलटतो की अशी स्थिती झाली होती. लॉर्ड शार्दुल ठाकुरच्या 49 व्या षटकात चौथ्या चेंडूवर रझाने जोरात फटका मारला होता. शुभमन गिल सीमारेषेजवळ होता त्याने चेंडूचा अंदाज घेतला मात्र चेंडू पुढे राहिला त्यावेळी हवेत झेप घेत गिलने चेंडू पकडला. सिकंदर 115 धावांवर बाद झाला