अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात (IND vs WI 2nd Odi) केएल राहुलचं (K L Rahul) अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं आहे. केएलकडून अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात गडबड झाली. त्यामुळे केएल 49 धावांवर रन आऊट होऊन तंबूत परतला. फक्त 1 रनमुळे हाफ सेंच्युरी हुकल्याने केएलने त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकवर असलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) पाहून नाराजी व्यक्त केली. (ind vs wi team india k l rahul unfortunately run out on 49 runs against west indies at narendra modi stadium ahmedabad)
नक्की काय झालं?
केमार रोच सामन्यातील 30 वी ओव्हर टाकत होता. केएल राहुल 47 चेंडूत 48 धावांवर खेळत होता. तर नॉन स्ट्राईक एंडवर केएलसोबत सूर्यकुमार यादव होता.
रोचने ओव्हरमधील चौथा चेंडू टाकला. अर्धशतकासाठी 2 धावांची गरज असल्याने तो उत्सूक होता. केएलने फटका मारला. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्राईक एंडवरुन स्ट्राईक एंडच्या दिशेने धावत सुटला.
मात्र केएल-सूर्यकुमार या दोघांमधील तालमेळ बिघडला. त्यामुळे केएल मध्येच काही सेकंद थांबला आणि पुन्हा धावत सुटला. त्यामुळे तो रनआऊट झाला.
दरम्यान, अवघ्या एका धावेने अर्धशतक हुकल्याची खंत आणि सूर्यकुमारवर असलेला राग राहुलने दाखवला नाही. मात्र त्याच्या चेहऱ्यावरुन संताप स्पष्टपणे दिसत होता.
केएलला चांगला सुर गवसला होता. केएलने 48 चेंडूत 4 चौकार आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 102.08 च्या स्ट्राईक रेटने 49 धावा केल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसीद्ध कृष्णा.
विंडिज टीम : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शमारह ब्रुक्स, डॅरेन ब्राव्हो, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, अकेल होसेन, फॅबियन अॅलन, अल्झारी जोसेफ आणि केमार रोच.
KL Rahul Run Out #INDvWI #KLRahul #ViratKholi pic.twitter.com/qcwkQohdko
— Saqlain Khan (@Saqlainejaz56) February 9, 2022