Pakistan Qualification Scenario : टीम इंडिया आणि यजमान युएसए या दोन्ही संघांमध्ये टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 25 वा सामना खेळवला जातोय. मात्र, या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया सुपर 8 चं तिकीट निश्चित करेल. पाकिस्तानविरुद्धच्या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव केला. 20 ओव्हरमध्ये 120 धावांचं किरकोळ आव्हान देखील पाकिस्तानला पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानने भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर गुडघे टेकवले. अशातच आता पाकिस्तानला टीम इंडियाकडून मोठी अपेक्षा असणार आहे. तीन दिवसांपूर्वी भारताविरुद्ध आग ओकणारा पाकिस्तान भारताच्या विजयाची प्रार्थना का करतोय? जाणून घ्या खरं कारण
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची जगभर नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. पण कॅनडाविरुद्ध पाकिस्तानने विजय मिळवला अन् भारताच्या भरोश्यावर भविष्य सोडलंय. पाकिस्तानला अद्याप 2 गुणच मिळवता आल्याने आता पाकिस्तानसाठी सुपर 8 फेरी गाठणं अधिकच कढीण झालंय. सध्या युएसएच्या खात्यात 4 गुण आहेत. त्यामुळे युएसए पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरतंय. अशातच टीम इंडियाने आज विजय मिळवला तर पाकिस्तानला आगामी वाटचाल सोपी होईल. परंतू भारत हरला किंवा सामना पावसामुळे ड्रॉ झाला तर पाकिस्तानला थेट घरता रस्ता गाठावा लागेल.
ग्रुप 'ए' चं समीकरण
भारताशिवाय अ गटात पाकिस्तान, कॅनडा, आयरर्लंड आणि अमेरिका यांचा समावेश आहे. भारत सध्या 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर यजमान अमेरिकेचेही 4 पॉईंट्स झाले आहेत. सुपर-8 मध्ये भारताचे स्थान निश्चित असून जर पाकिस्तानला सुपर 8 मध्ये स्थान मिळवायचं असेल पुढील दोन सामने यूएसए हरेल अशी आशा करावी लागेल. पण आता अमेरिकेने एकही सामना जिंकला तर सुपर-8 मध्ये त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. त्यामुळे एकंदरीत ए ग्रुपमधून भारत आणि यूएसए सुपर-8 मध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.