IND VS NZ 3rd Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात फलंदाजीत टीम इंडियाचे दिग्गज फेल ठरल्यावर युवा खेळाडूंनी मैदानात फटकेबाजी करून टीम इंडियाला सावरलं. टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टेस्ट सामना पार पडणार आहे. या सामन्याच्या सुरुवातीला झालेला टॉस न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीची निवड केली आणि भारताला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी भारताच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडने 10 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक 5 विकेट्स या रवींद्र जडेजाने घेतल्या तर वॉशिंग्टन सुंदरने 4 तर आकाश दीपने 1 विकेट घेतली.
हेही वाचा : मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार
न्यूझीलंडने 235 धावा केल्यावर भारतासमोर त्यांची वाघाडी मोडीत काढण्याचे आव्हान होते. मात्र टीम इंडियाला गरज असताना यावेळी देखील टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाले. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा 18 बॉलमध्ये 18 धावा करून बाद झाला. तर विराट कोहलीने एका चुकीमुळे अवघ्या 4 धावा करून आपली विकेट घालवली. दिवसाअंती टीम इंडियाने 4 विकेट्स गमावून 86 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर ऋषभ पंत आणि शुभमन गिलने मैदानात जोरदार फटकेबाजी केली.
— Mufaddal Vohra (mufaddal_vohra) November 2, 2024
भारताने स्वस्तात 4 विकेट्स गमावल्यावर सर्वांना वाटलं की पहिल्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियाची जशी अवस्था झाली तशीच आताही होईल. मात्र यावेळी गिल आणि पंत टीम इंडियाचे संकटमोचक ठरले. न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेल याने मागच्या दौऱ्यात मुंबईमध्ये 10 विकेट्स घेतले होते. मात्र ऋषभ पंतने त्याच्या बॉलिंगवर चौकारांची हॅट्रिक ठोकली. दुसऱ्या दिवशी एका धावाने सुरुवात करणाऱ्या पंतने मैदानात उतरताच चौकारांची हॅट्रिक केली. त्यानंतर त्याने दोन षटकार देखील ठोकले. पंतने 36 बॉल वर 7 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने त्याने अर्धशतक पूर्ण केलं. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील हा सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट हा सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्टमधील केलेले हे सर्वात जलद हा अर्धशतक होते. मात्र 37.3 व्या ओव्हरला 60 धावा करून पंत lbw आउट झाला.
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज