पोहे कडक किंवा कडकडीत होतात, खाताना घास लागतो; 'या' टिप्स वापरुन बनवा मऊसूत पोहे

How To Prevent Poha From Sticking: पोहे कधी कधी कढाईचा चिकटतात किंवा कधी जास्तच कडकडीत होतात. तर या टिप्स फॉलो करा  

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 25, 2024, 05:07 PM IST
पोहे कडक किंवा कडकडीत होतात, खाताना घास लागतो; 'या' टिप्स वापरुन बनवा मऊसूत पोहे  title=
kitchen hacks in marathi How To Make Poha Soft And Non Sticky

How To Prevent Poha From Sticking: सकाळी न्याहारीसाठी साधारणपणे मराठी घरांमध्ये कांदेपोहे केले जातात. कांदेपोहे हा पोटभरीचा नाश्ता असतो त्यामुळं यात अनेक पौष्टिक घटकही असतात. पण अनेकदा पोहे कडक होतात. त्यामुळं खाताना घास लागतो. या एका कारणामुळं अनेकदा पोहे खाणे टाळले जाते. तसंच, कडक व कडकडीत झालेल्या पोह्यांची चवदेखील चांगली लागत नाही. याचसाठी काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पोहे स्वादिष्ट आणि चमचमीत होण्यासह मऊ होण्यासाठी या टिप्स फॉलो करा. 

पोहे बनवण्याची सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही पोहे कसे व कितीवेळी धुता किंवा पाण्यात भिजवता. काही जण खूप कमी पाण्यात पोहे धुतात किंवा कधी जास्त वेळ पाण्यात भिजवता त्यामुळं पोहे एकदम चिपचिपीत होतात. तसंच, पोहे बनवण्यासाठी तुम्ही एकदाम जाड पोहे न घेता मिडियम पोहे घ्या. आता हे पोहे एका भांड्यात घेऊन ते चांगले धुवून घ्या. असं दोनदा करा. 

पोहे पाण्यातून भिजवून काढल्यानंतर ते एका बाजूला ठेवून द्या. जेणेकरुन पोहे नरम होतील आणि चांगले फुलतील. त्यानंतर पोह्यांसाठी लागणारी बाकीची तयारी करुन घ्या. आता तेलात जीरा आणि राई टाकून त्यात कडीपत्ता, हिरवी मिर्ची आणि कांदा टाकून त्यात थोडी हळद व हिंग टाका. आता कांदा चांगला कोमवून घ्या. कांदा कोमल्यानंतर आता भिजवलेले पोहे टाका आणि चांगले एकजीव करुन घ्या. नंतर चवीनुसार मीठ टाका. 

पोह्यात मीठ टाकल्यानंतरवरुन थोडे पाणी शिंपडा आणि पोह्यावर झाकण ठेवून चांगली वाफ घ्या. लक्षात ठेवा की गॅस मंद आचेवर असू द्यावा. पोहे वाफेवर छान शिजतात. पोहे एकदा का फोडणीला टाकले की ते जास्तवेळ शिजवू नका. एकदा का पोहे झाले की त्यावर लिंबू पिळून घ्यावा. अशाप्रकारे पोहे केल्यास ते अजिबात कडक वा कडकडीत होणार नाहीत.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)