IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारीला होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना जिंकला असला तरी दुसरा सामना जिंकणं मोठं आव्हान असणार आहे. पाहुण्या न्यूझीलंड संघासाठी हा सामना 'करो या मरो' असणार आहे. पहिला वनडे भारताने जरी जिंकला असला तरी सामना अटीतटीचा झालेला पाहायला मिळाला होता. (IND vs NZ 2nd ODI live streaming when and where to watch india vs new zealand marathi sport news)
हैदराबादमधील पहिली वनडे जिंकून टीम इंडिया वनडे मालिकेत 1-0 ने पुढे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही केव्हा आणि कुठे पाहता येईल याबाबत जाणून घ्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा टॉस हा 1 वाजता होणार आहे. या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. त्यासोबतच डीडी स्पोर्ट्सवरही मॅच पाहता येणार आहे. तुमच्याकडे जर हॉटस्टार सबस्क्रीप्शन असेल तर तुम्ही मोबाईलवरही ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकता.
दरम्यान, न्यूझीलंडने उद्याचाही सामना गमावल्यावर त्यांचं भारतात मालिका विजयाचं स्वप्न आणखी लांबणार आहे. आतापर्यंत न्यूझीलंडने 34 वर्षांमध्ये भारतामध्ये सहा मालिका खेळल्या आहेत मात्र त्यांना एकदाही विजयाची चव चाखता आली नाही. आताही मालिकेमध्ये भारताने पहिला सामना खिशात घालत आघाडी घेतली आहे. दुसराही सामना किवींनी गमावला तर रोहित अँड कंपनी विजयी आघाडी घेतील.