"भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video

Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माला शानदार DRS रिव्ह्यू घेण्यास पटवून देण्यात सरफराज खान आणि विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 24, 2024, 02:01 PM IST
"भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video  title=
Photo Credit: @JioCinema / X

India vs New Zealand: आज २४ ऑक्टोबरवर रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी सुरु आहे. सकाळी ९.३० पासून हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आर अश्विनने मोठा रेकॉर्ड करून हा सामना भारतीय चाहत्यांसाठी सुखदायक केला. याच दरम्यान सरफराज खान आणि विराट कोहलीने महत्त्वपूर्ण काम केले. न्यूझीलंडच्या डावातील रविचंद्रन अश्विन 24 वे षटक टाकत होता. यावेळी चेंडू लेगस्टंपच्या बाहेर होता. तरीही विल यंगने चेंडूवर बॅट करण्याचा प्रयत्न केला. बाऊन्समुळे तो हुकला.यष्टिरक्षकाने चेंडू पकडला. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि कीपर ऋषभ पंत यांनी कोणतेही आवाहन केले नाही. पण शॉर्ट लेग क्षेत्ररक्षक सर्फराज खान आणि गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांना नक्की काय झाले हे समजले. 

सर्फराज आणि विराटने धरला डीआरएससाठी आग्रह 

रविचंद्रन अश्विननेही अपील केले पण तो तेव्हा त्याचा आत्मविश्वासात नव्हता. दरम्यान अंपायरनेही आऊट देण्यास नकार दिला. दरम्यान सरफराज खान कर्णधार रोहित शर्माकडे गेला आणि डीआरएससाठी हट्ट करू लागला. त्याच्या मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या विराट कोहलीचीनेही त्याला साथ दिली. यावेळी सर्फराज रोहितला म्हणाला की, "भरोसा करो भाई...". यावर कर्णधार रोहित शर्मालाही नकार देता आला नाही. शेवटची  5 सेकंद शिल्लक असताना, DRL घेण्याचे संकेत दिले.

हे ही वाचा: रविचंद्रन अश्विनचे ​​नाव इतिहासाच्या पानात नोंदवले जाईल, शेन वॉर्नचा 'हा' 18 वर्ष जुना विक्रम मोडण्याच्या आहे जवळ

 

 

डीआरएस घेण्याचे फायदा झाला?

कर्णधार रोहितकढून DRL घेण्याची मागणी झाल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूसोबत चाहतेही श्वास रोखून स्क्रीनकडे बघत होते.  रिप्लेमध्ये काहीही स्पष्टपणे समजले नाही. म्हणून मग यानंतर स्निकोमीटर आला. जेव्हा चेंडू विल यंगच्या ग्लोव्हजजवळ होता, तेव्हा स्नीकोमीटरने हालचाल दाखवली. हे दिसताच संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम  दुमदुमले.  मैदानावर उपस्थित टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आनंद झाला. तिसऱ्या पंचाच्या आदेशानुसार मैदानावरील पंचांनी आपला निर्णय बदलला आणि विल यंगला आऊट दिला.

हे ही वाचा: IND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्या

सर्फराजच्या या यशानंतर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डौल म्हणाला, "सरफराजने इथे प्रमुख कामगिरी केली. तो सकाळपासूनच हुशार खेळ खेळत आहे." तर  भारताचा माजी सलामीवीर अभिनव मुकुंदने जिओ सिनेमावर सांगितले की, "या विकेटचे श्रेय सरफराज खानला द्यायला हवे. तो एकटाच होता ज्याला पूर्ण खात्री होती. ऋषभ पंतला काही सुगावा लागला नाही. "

कसोटी सामन्यातील हा एक मोठा क्षण होता कारण विल यंग आणि डेव्हन कॉनवे यांनी 44 धावांची प्रभावी भागीदारी करून भारताकडून खेळ हिरावून घेण्याची धमकी दिली होती. यंग 45 चेंडूत 18 धावा काढून बाद झाला.