IND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल

Babar Azam: आयसीसी विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला आता दोन दिव होत आलेत, पण अजूनही क्रिकेट चाहत्यांवर याचा फिव्हर कायम आहे. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगा टीव्ही फोडताना दिसत आहे.

राजीव कासले | Updated: Oct 16, 2023, 05:34 PM IST
IND vs PAK: बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानमध्ये टीव्ही फुटला, छोट्या फॅनचा व्हिडिओ व्हायरल title=

IND vs PAK Funny Video : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 7 विकटने पराभव केला. या विजयाबरोबर विश्वचषकाच्या इतिहासत पाकिस्ताविरुद्ध अजिंक्य राहाण्याची पंरपरा टीम इंडियाने (Team India) कायम ठेवली. या सामन्याला आता दोन दिवस होत आले आहेत, पण अद्यापही सामन्याचा फिव्हर चाहत्यांवर कायम आहे. भारतात या विजयानंतर जल्लोष करण्यात येतोय. तर पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. विश्वचषकात पराभवाची मालिका बाबर आझमचा (Babar Azam) पाकिस्तान संघ (Pakistan Cricket Team) खंडीत करेल अशी अपेक्षा पाकिस्तानी चाहते बाळगून होते. पण त्यांचा भ्रमनिरास झाला आणि चाहत्यांच्या संतापाचा बांध फुटला. पाकिस्तानी फॅनचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी चाहत्याने टिव्ही फोडला
आयसीसी विश्वचषकात शनिवारी पारंपारिक प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना झाला. पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने सुरुवात चांगली केली. पाकिस्तानने केवळ दोन विकेटच्या मोबदल्यात 150 धावांचा टप्पा पार केला होता. खेळपट्टीवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम उभा होता. पण 50 धावांवर असताना बाबर आझम आऊट झाला आणि पाकिस्तानचा संपूर्ण संघ ढेपाळला. यानंतर पाकिस्तानी चाहते बाबार आझमवर चांगलेच संतापले. बाबर आझम क्लिन बोल्ड झाल्यानंतर एका लहान पाकिस्तानी क्रिकेट चाहता इतका संपातला की त्याने चक्क घरातला टीव्हिच फोडून टाकला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
चाहत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधलं एक कुटुंब एकत्र बसून भारत-पाकिस्तान सामना बघताना दिसत आहे. बाबर आझम फलंदाजी करत असताना हे क्रिकेट प्रेमी कुटुंब जल्लोष करताना दिसतंय. पण भारताच्या मोहम्मद सिराजने बाबरचा क्लिन बोल्ड घेतला. यावेळी कुटुंबातला लहान क्रिकेट चाहता इतका संतापला की त्याने हातातली एक जड वस्तू थेट टिव्हीवर फेकून मारली. यामुळे टिव्ही फुटला आणि भिंतीवरुन खाली कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबातील इतर सदस्य हैराण होतात. 

भारताची पाकिस्तानवर मात
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 14 ऑक्टोबरला पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तावर 7 विकेटने मात केली. पहिली फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा संघ अवघ्या 191 धावांवर आटोपला. विजयाचं हे माफक आव्हान भारतीय संघाने अवघ्या 30 व्या षटकात पार केलं. विश्वचषक इतिहासातला भारताचा पाकिस्तानविरुद्धचा हा आठवा विजय ठरला. या सामन्यात गर्दीचाही रेकॉर्ड झाला.