नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला ५-०ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला आहे. या विजयात भारताचा जलद गती गोलंदाज जसप्रित बुमराह यांचा मोठा वाटा आहे.
बुमराहने एकूण १५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या शानदार गोलंदाजीमुळे त्याला मॅन ऑफ द सिरीजचा खिताब देण्यात आला. त्यामुळे त्याने एकूण २७ स्थानाची झेप घेत आयसीसीच्या वन डेतील गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा जॉश हेझलवुड हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा स्पीनर इमरान ताहीर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क यांचा क्रमांक लागतो.
यापूर्वी २३ वर्षीय बुमराह याची आयसीसी रँकींगमध्ये २४ ही सर्वात बेस्ट पोझिशन होती. पण त्याने श्रीलंकन सिरीजमध्ये १५ विकेट घेऊन त्याने २७ स्थानांची झेप घेतली.
BOWLING (top 10)
Rank Player Team Points
1 Josh Hazlewood Aus 732!
2 Imran Tahir SA 718
3 Mitchell Starc Aus 701
4 Jasprit Bumrah Ind 687*
5 Kagiso Rabada SA 685
6 Trent Boult NZ 665
7 Hasan Ali Pak 663*
8 Sunil Narine WI 662
9 Rashid Khan Afg 647*
10 Akshar Patel Ind 645*