भज्जीने शेअर केला दोन चिमुरड्यांचा भावुक VIDEO

टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पीनर हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो.  सामाजिक विषयावर तो नेहमी ट्विटरवर आपले मत मांडत असतो. 

Updated: Sep 4, 2017, 05:15 PM IST
भज्जीने शेअर केला दोन चिमुरड्यांचा भावुक VIDEO

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार ऑफ स्पीनर हरभजन सिंग सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो.  सामाजिक विषयावर तो नेहमी ट्विटरवर आपले मत मांडत असतो. 

हरभजनने शनिवारी आपल्या ट्विटर हँडलवरून एक खूपच भावुक करणारा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये दोन भावांमध्ये असलेली जवळीकता दाखविण्यात आली आहे. हे पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील. 

भज्जीने केलेली ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. याला हजारो लोकांनी रिट्विट आणि लाइक केले, तसेच कमेंटही केले आहेत. 

 

व्हिडिओमध्ये एक मोठा भाऊ, ज्याचे दोन्ही हात नाही आहे. तो आपल्या नवजात रडणाऱ्या भावाला पाहतो. नवजात भाऊ भुकेने रडताना दिसत आहे. त्यावेळी हा हात नसलेला भाऊ त्याला लहान्यापासून दूर असलेली चुसणी त्याला हात नसताना आपल्या तोंडाने पकडून भावाला देतो.  तोंडात चुसणी आल्यावर लहान भाऊ शांत होतो.